देवळाली प्रवरा येथे विराज प्रतिष्ठानच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी


देवळाली प्रवरा येथे विराज प्रतिष्ठानच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी-विजय एस भोसले 

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे विराज प्रतिष्ठान आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे  जयंती साजरी करण्यात आली.   अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त देवळाली प्रवरा दुरक्षेत्र येथे अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा भेट देण्यात आली.  यावर्षी कोरोनाची गंभीर परिस्थिती असल्यामुळे शासनाच्या नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

          यावेळी  नाशिक विभाग म्हाडा अध्यक्ष शिवाजीराव ढवळे,  चैतन्य उद्योग समुहाचे अध्यक्ष गणेश भांड, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, मुंबई येथील उद्योजक सुनील भालेराव , अजित कदम, नगरसेवक शैलेंद्र कदम , आदिनाथ कराळे ,ज्ञानेश्वर वाणी , माजी नगरसेवक दगडू सरोदे , संतोष चोळके, बाबुराव पाटील युवा मंचचे कुणाल पाटील, शुभम पाटील , मयूर अडागळे व आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विराज प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते प्रयत्नशील होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News