लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी शाहिरीतून समाज जागृती केली -माजी नगरसेवक संजय शेंडगे


लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी शाहिरीतून समाज जागृती केली -माजी नगरसेवक संजय शेंडगे

नगर -(प्रतिनिधी संजय सावंत) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी वंचित, दुर्लक्षित घटकांसाठी मोठे कार्य केले. या दुर्लक्षित घटकांच्या व्यथा त्यांनी आपल्या साहित्यातून मांडल्या. आपल्या शाहिरीतून समाज जागृतीचे काम केले. त्यांचे साहित्य समाज मनाला भिडणारे होते. जोपर्यंत समाज शिक्षित व जागृत होत नाही, तोपर्यंत त्यांची प्रगती नाही, हे जाणून त्यांनी समाजासाठी कार्य केले. त्यांच्या कार्याचे स्मरण आपण नेहमी ठेवले पाहिजे, असे प्रतिपाद माजी नगरसेवक संजय शेंडगे यांनी केले

     लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्यावतीने लालटाकी येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड आदि उपस्थित होते. याप्रसंगी संभाजी कदम  म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरीतून समाज प्रबोधनाचे मोठे कार्य केले. दुर्लक्षित व तळागाळातील समाजाच्या व्यथा त्यांनी आपल्या साहित्यातून मांडून समाजाला जागृत केले. त्यांची भेदक शाहिरी समाजमनाला भिडणारी होती. त्यांच्या महान कार्याचे आपण कायम स्मरण केले पाहिजे, असे सांगितले. यावेळी अनेक मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा आढावा घेतला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News