दुध दर वाढीसाठी चौफुला येथे राज्यसरकार विरोधात आंदोलन


दुध दर वाढीसाठी चौफुला येथे राज्यसरकार विरोधात आंदोलन

पुणे प्रतिनिधी विठ्ठल होले :

भाजप, रासप, आर पी आय, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम महायुतीच्यावतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी चौफुला येथे शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व दुग्ध विकास मंत्री यांच्या फोटो ला दुधाचा अभिषेक घालत सरकारचा निषेध करण्यात आला.

दौंड तालुक्यातील आज शेतकऱ्यांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी महायुतीचा वतीने  राज्य सरकारचा निषेध करत दुधाला बाजारभाव व अनुदान मिळावे, यामागणीसाठी आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले.  शेती उद्योगात जर पाहिलं तर महिलांचा मोठा वाटा असतो यामध्ये शेतीतले काम प्रथमता दूध काढणे दुधाच्या किटल्या भरणे दूध डेअरीपर्यंत पोहोच करणे या महिलाच करत असतात तर संसाराचा गाडा हाकण्यासाठी महिलांना दुधाला भाव मिळणे गरजेचे आहे ह्या अनुभवातून स्पष्ट दिसून आलेला आहे खरं या  आंदोलनांमध्ये वासुदेव काळे, तानाजी दिवेकर ,गणेश आखाडे, भानुदास शिंदे ,दादा केसकर, हरीश खोमणे, अनिता ताकवणे, वर्षा भागवत, मंगल खेडेकर, मनिषा नवले, छाया दिवेकर, तानाजी केकाण, सर्फराज शेख व इतर मान्यवर होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News