राहुरी फॅक्टरी येथे सर्व पक्षीय च्या वतीने अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन


राहुरी फॅक्टरी येथे सर्व पक्षीय च्या वतीने अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

राहुरी फॅक्टरी / प्रतिनिधी-विजय एस भोसले 

फक्त दीड दिवस शाळा शिकून अक्षर साहित्याची निर्मिती करणारा अनभिषिक्त साहित्य सम्राट, शिवछत्रपतींचा पोवाडा सातासमुद्रापार आपल्या बुलंद आणि पहाडी आवाजात सादर करुन महाराजांची किर्ती सातासमुद्रापार पोहचविणारा पहिला शिवशाहीर, संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा प्रमुख शिलेदार, कामगार चळवळीचा महानायक,शोषित,उपेक्षित,वंचित, कामगार श्रमिकांचा आवाज साहित्यातून बुलंद करणारा, मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी चळवळीच्या अवलोकनातून मानवतावादाचा पुरस्कार करणारा विश्वविख्यात साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी अर्थात शंभराव्या जयंती निमित्त त्रिवार अभिवादन राहुरी फॅक्टरी येथील आंबेडकर चौक येथे पुष्प अर्पन करुन करण्यात आले. या वेळी रिपब्लिकन पक्षाचे राहुरी तालुका अध्यक्ष विलास साळवे,शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दिपक त्रिभुवन,जैन श्रावक चे प्रविण सोनी, भारतीय बौध्द महासभा विजय भोसले,अतुल त्रिभुवन व भिमतेज मित्र व अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाचे पदाधिकारी या जयंतीत उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News