साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे स्मारकाजवळ सांस्कृतिक भवन व्हावे महोदय !! नितिन पोळ.


साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे स्मारकाजवळ सांस्कृतिक भवन व्हावे महोदय !! नितिन पोळ.

साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी दिवसी लोक स्वराज्य आंदोलन पक्षाची मागणी.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी. 

कोपरगाव शहरात सर्वच जाती धर्माचे सांस्कृतिक भवन अस्तित्वात आहे मात्र मातंग समाजाला अद्याप पर्यंत सांस्कृतिक भवन नाही. कोपरगाव शहरात येवला रोड वर नगर पालिकेच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे काम प्रगती पथावर आहे मात्र या स्मारकाच्या पाठीमागे बरीच जागा अजून शिल्लक असून या ठिकाणी आमदार निधीतून भव्य असे सांस्कृतिक भवन उभे राहावे या ठिकाणी सांस्कृतिक भवन उभे राहिल्यास लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकाच्या जवळ अतिक्रमण होणार नाही तसेच गावाच्या मुख्य मार्गावर सांस्कृतिक भवनांची उभारणी केल्यास सर्वच समाज बांधवांना विविध कार्यक्रम घेण्यास जागा उपलब्ध होईल

दि१ऑगस्ट २०२०रोजी लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांची जन्म शताब्दी असून या दिवशी समाज भावनेचा व उपलब्ध जागेचा विचार करून सांस्कृतिक भवन व्हावे. त्या करिता निधी व सांस्कृतिक भवन उभारण्याची घोषणा साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या जन्म शताब्दी चे औचित्य साधून करण्यात यावी.अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नितिन पोळ यांनी आ. आशुतोष काळे यांच्याकडे केली आहे, सोमनाथ म्हस्के, बाळासाहेब पवार, किरण अढांगळे, सुजल चंदन शिव, राजू रोकडे, भारत रोकडे,राजेंद्र खैरनार, नितीन साबळे प्रवीण शेलार, गंभीर पवार , किरण सोळशे, नाना बत्तीसे, गीतेश पोळ दिपक कांबळे, राकेश कांबळे व सर्व पदाधिकारी लोक स्वराज्य आंदोलन कोपरगाव शहर व तालुका

जाहिरात
Search
विडिओ
Recent News