घरी आलेल्या पाहुण्यासह पत्नीचा ही केला खून, खुनाचे कारण अद्याप गुलदस्त्यात


 घरी आलेल्या पाहुण्यासह पत्नीचा ही केला खून, खुनाचे कारण अद्याप गुलदस्त्यात

विठ्ठल होले पुणे

यवत प्रतिनिधी-- दौंड तालुक्यातील  खुटबाव जवळ एका झोपडीत एक महिला एका पुरुषाचा खून झाल्याचे यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी सांगितले, दौंड तालुक्यातील खुटबाव येथील मटकाळा हद्दीत निर्जनस्थळी असणा-या एका झोपडीत अज्ञात कारणावरुन आरोपीने पत्नी आणि एक नातेवाईक असा दोन जणांचा कोयता आणि बांबूने मारहाण करीत निघृणपणे  खून केला आहे.हि घटना काल रात्रीच्यावेळी घडली आहे.यवत पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.खुटबाव गावच्या हद्दीत असणा-या नवा मुठा उजवा कालव्यानजीक हे आदिवाशी कुटूंब एका पालासारख्या झोपडीत वास्तव्यास आहे.गुरूवारी या कुटूंबात मंगेश जाधव हा पाहूणा मुक्कामी आला होता.त्यांच्यात रात्री कोणत्यातरी कारणाने भांडण झाले होते.याच कारणाने  चिडलेल्या आरोपीने त्याची पत्नी  आणि पाहुण्याचा बांबू आणि कोयत्याने खून केला आहे. यवत  पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

आज घटनेची माहिती मिळताच दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे.अधिक तपास यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक भाऊसाहेब पाटील हे करीत आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News