कुरकुंभ | येथील साक्षी शिंदे दहावीच्या परीक्षेत 97 टक्के गुण मिळवुन विद्यालयात प्रथम!


कुरकुंभ | येथील साक्षी शिंदे दहावीच्या परीक्षेत 97 टक्के गुण मिळवुन विद्यालयात प्रथम!

केडगाव प्रतिनीधी

कुरकुंभ येथील श्री फिरंगाईमाता विद्यालयातील साक्षी शिंदे या विद्यार्थीनीने परीस्थितीवर मात करून दहावीच्या परीक्षेत 97 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला आहे. आई वडिलांच्या कष्टाची जाण ठेवत या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. साक्षी हिचे वडिल दिलीप शिंदे पेट्रोलपंप कर्मचारी आहेत तर आई अंगणवाडी मध्ये काम करत आहे. अशा परीस्थितीत मुलांची शिक्षणाची जबाबदारी योग्यरीत्या पार पाडतातआई वडिलांना दोन्ही मुलीच असल्याने मुलाची उणीव कधीच साक्षीने आई वडिलांना भासू दिली नाही.  मुलगी ही घराचे नावलौकीक करू शकते व याची जाणीव ठेवुन जिद्दिने, चिकाटीने आपले ध्येय समोर ठेवुन साक्षी हिने आई- वडिलांचे स्वप्न पुर्ण करून दाखवले.

            सध्याच्या काळात मुली ह्या सगळयाच क्षेत्रात नावलौकीक मिळवत आहेत. प्रत्येक क्षेत्रात आपला सहभाग नोंदवत आहेत. शहरा बरोबरच आता ग्रामीण भागातील मुलीदेखील मागे नाहीत याचीच पावती साक्षीने दाखवुन दिली आहे. जेमतेम परीस्थितीत आपण कशा प्रकारे यशाचा मार्ग शोधु शकतो हे साक्षी ने ओळखुन घेतले आणि हे यश संपादन केले.

                  तिच्या या यशाबद्दल शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केशवराव शितोळे, कार्याध्यक्ष अनिल शितोळे, सचिव सचिन शितोळे, प्राचार्य  नानासाहेब भापकर, कुरकुंभ गावचे सरपंच राहुल भोसले, पोलिस पाटिल रेश्मा शितोळे ग्रा.सदस्य विनोद शितोळे, पर्यवेक्षक सिकंदर शेख तसेच संस्थेचे संचालक मंडळ,  शिक्षक व ग्रामस्थ यांच्याकडुन साक्षीचे कौतुक होत आहे. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News