10वीच्या परीक्षेत 98.40टक्के गुण मिळविणाऱ्या कुमारी शुभदा खाडे हिचा वृद्धेश्वर मल्टिस्टेट तर्फे सत्कार


10वीच्या परीक्षेत 98.40टक्के गुण मिळविणाऱ्या कुमारी शुभदा खाडे हिचा वृद्धेश्वर मल्टिस्टेट तर्फे सत्कार

श्रीगोंदा(प्रतिनिधी):- येथील वृद्धेश्वर मल्टिस्टेट अर्बन सोसायटी संचालक वामनराव खाडे यांची मुलगी कुमारी शुभदा हिला बुधवार दि.२९रोजी जाहीर झालेल्या एसएससी (१०वी) परीक्षा निकालात ९८.४० टक्के गुण मिळविल्या बद्दल वृद्धेश्वर मल्टिस्टेट आणि चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन विठ्ठलराव वाडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना वाडगे यांनी ९८टक्के गुण मिळविणे पूर्वी मोठ्या शहरातच शक्य होते परंतु अभ्यास आणि आत्मविश्वासामुळे ग्रामीण भागातील मुली देखील गुण मिळवू शकतात हे शुभदा हिने सिद्ध केले आहे .सोसायटी संचालक वामनराव खाडे,कर्मचारी आदी सामाजिक अंतर पालन करत उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना कुमारी.शुभदा हिने वर्षभर अभ्यासाचे नियोजन विशेष प्राविण्य मिळविण्याचे ध्येय आणि आई,वडील,शाळेच्या मुख्याध्यापिका,शिक्षक आदींचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगितले. शुभदा हि श्रीगोंदा येथील विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी असून या शाळेचा १००टक्के निकाल लागला आहे


---------------///---------------------


जाहिरात
Search
विडिओ
Recent News