श्रीगोंदा येथील ठाणगेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात दोन मेंढ्या ठार तर दोन जखमी


श्रीगोंदा येथील ठाणगेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात दोन मेंढ्या ठार तर दोन जखमी

श्रीगोंदा प्रतिनिधी दि.३०: येळपणे ता. श्रीगोंदा येथील ठाणगेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात दोन मेंढ्या ठार तर दोन जखमी झाल्या आहेत. जखमी मेंढ्यावर वन खाते उपचार करत आहे.

        याबाबत सविस्तर माहिती अशी की येळपणे येथील ठाणगेवाडी येथील मेंढपाळ आण्णा नाना कोळपे यांनी आपल्या गोठ्यात मेंढ्या पाळल्या आहेत. शुक्रवार दि.३० रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास अन्नाच्या शोधात फिरत असलेल्या बिबट्याने कोळपे यांच्या घराकडे मोर्चा वळवला. गोठ्यात असलेल्या मेंढ्यावर शिकारीच्या उद्देशाने हल्ला केला. मेंढ्यांचे ओरडणे व गोंधळ उडाल्याने घरातील लोक बाहेर आले. कुटुंबातील व्यक्तींनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने धूम ठोकली. तोपर्यंत हल्ल्यात बिबट्याने दोन मेंढ्यांचे मुंडके तोडून व पोट फाडल्याने दोन  जागीच ठार झाल्या तर दोन मेंढ्यांच्या पाठीमागे चावा घेतल्याने गंभीर जखमी होऊन अत्यवस्थ झाल्या आहेत.त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

            वनविभागाला कळविल्यावर वनक्षेत्रपाल अश्विनी दिघे व वनपाल मच्छिंद्र गुंजाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत मेंढ्यांचा पंचनामा केला. कोळपे यांचे अंदाजे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.बिबट्याच्या हल्ल्यामूळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्या पकडण्यासाठी वनविभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News