अमरापूर विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम..


अमरापूर विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम..

शेवगाव / प्रतिनीधी  सज्जाद पठाण-  एफ.डी.एल शिक्षण संस्थेच्या अमरापूर ( ता. शेवगाव ) येथील अमरापूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल जाहीर झाला असून विद्यालयाने उज्वल यशाची परंपरा कायम राखली.

एस एस सी बोर्ड पुणे यांचेकडून जाहीर झालेल्या ऑनलाईन निकालात अमरापूर विद्यालयातून  शुभांगी संजय तागड ( ८३ टक्के ) हिने प्रथम क्रमांक प्राप्त पटकावला. द्वितीय क्रमांक हर्षवर्धन संतोष चौधरी ( 80 टक्के ) तर तृतिय क्रमांक रोहिणी गोरक्ष फलके (  79.40 टक्के ) हिने मिळविला.  

प्राचार्य राजू मगर व शिक्षकवृंदानी यशासाठी परिश्रम घेतले.  या यशस्वी विद्यार्थ्यांचे एफडीएलचे अध्यक्ष अॅड. शिवाजीराव काकडे, जि.प. सदस्या हर्षदाताई काकडे, शैक्षणिक विभाग समितीचे प्रमुख प्रा. लक्ष्मणराव बिटाळ, विद्यालयाचे समन्वयक अन्नदाते सर आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  

----------------------------------------

जाहिरात
Search
विडिओ
Recent News