दौंड ग्रामीण भागात 9 तर शहरात चार जण पॉझिटीव्ह,रुग्णामध्ये 15 ते 60 वयोगटातील व्यक्ती


दौंड ग्रामीण भागात 9 तर शहरात चार जण पॉझिटीव्ह,रुग्णामध्ये 15 ते 60 वयोगटातील व्यक्ती

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी-- दौंड शहर व तालुक्यात दोन दिवसांच्या विश्रांती नंतर पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे,दौंड शहरातील 30 जुलै रोजी एकूण 22लोकांचे स्वाब घेण्यात आले होते त्यापैकी चार जण पॉझिटीव्ह आल्याचे दौंड उपजिल्हा रुग्णालय अधिक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी सांगितले आहे, तर दौंड तालुक्यात 53 लोकांचे स्वाब घेण्यात आले होते त्यापैकी नऊ लोकांना कोरोना संसर्ग झाल्याचे आरोग्य अधिकारी डॉ अशोक राजगे यांनी सांगितले,दौंड शहरात दोन महिला व दोन पुरुष आहेत,त्यामध्ये बंगला साईड 1,स्वामी समर्थ मंदिर 1,शालीमार चौक 2 व्यक्ती आहेत,ग्रामीण भागात राहू येथील चार जण आहेत त्यामध्ये 60,45,30 वयाचे तीन पुरुष आहेत,तर 15 वर्षांची मुलगी आहे,केडगाव मध्ये 45 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला आहे, वरवंड येथील 18 वर्षाचा युवक असून भांडगव येथील 17 व 15 वर्षाच्या मुली असल्याचे डॉ अशोक राजगे यांनी सांगितले आहे,दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे, त्यामुळे कोरोना  आटोक्यात आल्याचे वाटत असतानाच संख्या वाढत चालली आहे,त्यामुळे काळजी वाढली  आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News