मदनवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी तेजस एकनाथ देवकाते यांची बिनविरोध निवड करण्यात आली


मदनवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी तेजस एकनाथ देवकाते यांची बिनविरोध निवड करण्यात आली

भिगवण (प्रतिनिधी) नानासाहेब मारकड

मदनवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सुदर्शना थोरात यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदाकरिता सदस्यांची सरपंच आम्रपाली बंडगर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपसरपंच पदाकरिता तेजस देवकाते यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी भागवत गाताडे यांनी उपसरपंच पदी तेजस देवकाते यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे राज्यसरचिटणीस मारुतराव वनवे कर्मवीर सहकारी साखर कारखान्याचे मा. संचालक रंगनाथ देवकाते,संचालक अशोक वनवे,रोटरीचे अध्यक्ष संपतराव बंडगर  राजाभाऊ देवकाते,शिवाजी देवकाते,विश्वास देवकाते,सोमनाथ गुरगुळे,रणजित निकम,वसंत बंडगर, हनुमंत थोरात, योगेशबंडगर,नानासाहेब बंडगर,लाला कुभांर,आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नूतन उपसरपंच तेजस देवकाते यांनी सांगितले की,मदनवाडी गावातील सर्व सामान्य जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, गटर योजना आणि ग्रामसचिवालय आदी प्रश्न मार्गी लावण्याकरीता प्राधान्याने प्रयत्न करनार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News