आमदार आशुतोष काळेंच्या पाठपुराव्यातून वंचित शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान शेतकरी योजनेचे १.४० कोटी जमा


आमदार आशुतोष काळेंच्या पाठपुराव्यातून वंचित शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान शेतकरी योजनेचे १.४० कोटी जमा

संजय भारती कोपरगाव, प्रतिनिधी:

पहिल्याच जनता दरबारात अनेक शेतकऱ्यांनी पंतप्रधान शेतकरी. सन्मान निधी. योजनेचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी मांडल्या होत्या. योजनेच्या लाभापासून वंचित शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून जवळपास सात हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला .असून शेतकऱ्यांच्या खात्यात १.४० कोटी रुपये जमा झाले. असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.

      शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी केंद्र शासनाकडून देशातील शेतकऱ्यांसाठी मागील वर्षापासून पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून सरकारकडून शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांच्या हफ्त्याने प्रत्येक वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येतात. या योजनेचे पहिला टप्पा मागील वर्षी पार असून मतदार संघातील अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहत होते. त्याबाबत शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात झालेल्या जनता दरबारामध्ये योजनेचा लाभ मिळत नसल्याची कैफियत आमदार आशुतोष काळे यांच्यापुढे असंख्य शेतकऱ्यांनी मांडल्या होत्या. त्याबाबत तहसीलदार योगेश चंद्रे व कृषी विभागाला त्यांनी योजनेपासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी येत असलेल्या अडचणी जाणून घेत जातीने लक्ष घालून पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्यातून योजनेपासून वंचित असणाऱ्या सात हजार शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा झाले आहेत.

       या योजनेचे आजपर्यंत दोन टप्पे पार पडले असून लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात एकून पाच हफ्त्यात आजपर्यंत २४ कोटी रुपये जमा झाले आहेत. अजूनही या योजनेचा लाभ मिळत नसलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. ज्या वंचित लाभार्थ्यांना पाच ह्फ्त्यांपैकी फक्त दोन हजार रुपयांचा एकच हफ्ता मिळाला त्या शेतकऱ्यांना अजून चार ह्फ्त्यांची रक्कम रुपये आठ हजार मिळावे व ज्या शेतकऱ्यांनी योजनेसाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही काही शेतकरी अजूनही या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेपासून वंचित आहेत अशा शेतकऱ्यांना तातडीने या योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना पाठविलेल्या पत्रात केलेली आहे.

आमच्या गावातील अनेक शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत होता मात्र मी सगळे कागदपत्राची पूर्तता करून देखील मला लाभ मिळत नव्हता त्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांच्या जनता दरबारात त्यांच्या कानावर हि गोष्ट घातली होती. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे मला शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळाला असून जुलै महिन्यात माझ्या बँक खात्यात २००० रुपये जमा झाले आहेत. – दिगंबर बढे,कुंभारी लाभार्थी शेतकरी

जाहिरात
Search
विडिओ
Recent News