कोरोनाच्या नावाखाली सर्वसामान्य रुग्णांची लूट व पिळवणुक थांबविण्यासाठी रविवारी महागांधीगिरी क्रांती घंटानाद आंदोलन


कोरोनाच्या नावाखाली सर्वसामान्य रुग्णांची लूट व पिळवणुक थांबविण्यासाठी रविवारी महागांधीगिरी क्रांती घंटानाद आंदोलन

पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचा पुढाकार

अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत) - कोरोनाच्या नावाखाली खाजगी दवाखान्यात सर्वसामान्य रुग्णांची चालू असलेली आर्थिक लूट, कोरोना रुग्णासाठी येणार्‍या निधीवर मारला जाणारा डल्ला, तर जिल्हा रुग्णालयात रुग्णांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्याकरिता पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या वतीने रविवार दि.1 ऑगस्ट रोजी हुतात्मा स्मारकात महागांधीगिरी क्रांती घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. तसेच नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी निसर्गोपचार औषध पध्दतीची वेबीनारद्वारे माहिती देऊन चला वाफ घेऊ या, चे आवाहन केले जाणार आहे. कोरोना महामारीचा फायदा घेऊन अनेक खाजगी हॉस्पिटलनी सर्वसामान्य रुग्णांची आर्थिक लूट सुरु केलेली आहे. या रोगावर उपचार नसून देखील लाखोंच्या घरात बील येत आहे. जिल्हाधिकारी यांनी दर जाहीर केले असताना सुध्दा या आदेशाला पायदळी तुडविले जात आहे. कोरोनाच्या एक रुग्णामागे मोठा निधी येते असून, त्यावर देखील डल्ला मारण्याचा प्रकार सुरु झाला आहे. जिल्हा रुग्णालयात तर मानवतावाद विसरुन रुग्णांची मोठी हेळसांड चालू असल्याचा आरोप स्वयंसेवी संघटनांच्या वतीने करण्यात आला आहे. रविवारी स्नेहालयाचे डॉ.गिरीश कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत महागांधीगिरी क्रांती घंटानाद आंदोलन केले जाणार आहे. तसेच वेबीनारद्वारे नागरिकांना निसर्गोपचार पध्दतीने आरोग्याबाबत जागृती करण्यासाठी तज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत. वाफ घेणे, पुरेश्या सुर्यप्रकाशात जाणे, शरीराला रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आवश्यक व्हिटॅमीन सी, फिजीकल डिस्टन्स, मास्कचा वापर, आयुर्वेदिक काडा, पौष्टिक आहार व व्यायाम संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी अ‍ॅड. गवळी, कॉ.बाबा आरगडे, माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, डॉ.गोपाळ घरे, सखाराम सरक, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, शाहीर कान्हू सुंबे आदी प्रयत्नशील आहेत. रुग्णामागे मोठा निधी येते असून, त्यावर देखील डल्ला मारण्याचा प्रकार सुरु झाला आहे. जिल्हा रुग्णालयात तर मानवतावाद विसरुन रुग्णांची मोठी हेळसांड चालू असल्याचा आरोप स्वयंसेवी संघटनांच्या वतीने करण्यात आला आहे. रविवारी स्नेहालयाचे डॉ.गिरीश कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत महागांधीगिरी क्रांती घंटानाद आंदोलन केले जाणार आहे. तसेच वेबीनारद्वारे नागरिकांना निसर्गोपचार पध्दतीने आरोग्याबाबत जागृती करण्यासाठी तज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत. वाफ घेणे, पुरेश्या सुर्यप्रकाशात जाणे, शरीराला रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आवश्यक व्हिटॅमीन सी, फिजीकल डिस्टन्स, मास्कचा वापर, आयुर्वेदिक काडा, पौष्टिक आहार व व्यायाम संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी अ‍ॅड. गवळी, कॉ.बाबा आरगडे, माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, डॉ.गोपाळ घरे, सखाराम सरक, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, शाहीर कान्हू सुंबे आदी प्रयत्नशील आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News