देवळालीत भूगर्भातील पाणी पातळी वाढली


देवळालीत भूगर्भातील पाणी पातळी वाढली

राहुरी प्रतिनिधी-विजय एस भोसले 

देवळाली प्रवरा गावात गेल्या दोन वर्षापासून राजश्री प्रतिष्ठाण, पुणे व सत्यजित कदम फाऊंडेशनच्या माध्यमातुन जलसंधारणाचे १३ किलोमीटर ओढ्यांची खोलीकरण व रुंदीकरणाची कामे लोकसहभागातुन झाली आहेत व गेल्या काही दिवसापासून रोज पाऊस पडत आहे. त्यामुळे ओढ्यांवरती बांधलेली बंधारे व तळे तुडूंब भरुन ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे गावातील जमीनीत पाणी मुरल्याने पाण्याची पातळी वाढली आहे. विहीरी व कुपनलिका तुडूंब भरली आहेत व कुपनलिकामधून आपोआप पाणी बाहेर पडत आहे. त्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे.  गेल्या अनेक वर्षापासून शहरात भूगर्भातील पाणी पातळी घटल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी परिस्थिती ओळखुन गावातील ओढे-नाले खोलीकरण व रुंदीकरणाचे काम हाती घेतले व १३ किलोमीटर लांबीचे काम पूर्ण केले. पुरेसा पाऊस झाल्याने पाणी जमीनीत मुरल्याने भूगर्भातील पाणी पातळी वाढली. अद्यापही राहीलेल्या ओढ्या-नाल्यांचे रुंदीकरण व खोलीकरणाचे जलसंधारणाचे काम पूर्ण करण्याचा त्यांचा संकल्प आहे. माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी गावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवून वाड्या-वस्त्यापर्यंत पिण्याचे पाणी पोहचविले व नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी निवडणूकीत दिलेल्या शब्दाला जागून शेतकर्‍यांचा जलसंधारणाची कामे करुन शेतीचा पाण्याचा प्रश्न सोडविला अशी शेतकरी वर्गात चर्चा आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News