देवळाली प्रवरा येथे अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान


देवळाली प्रवरा येथे अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

राहुरी प्रतिनिधी-विजय एस भोसले 

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या नुकसानीचे तातडीने महसूल यंत्रणेमार्फत पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अन्यथा शेतकऱ्यांना आंदोलना चे हत्यार उपसावे लागेल असा इशारा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शहाजी कदम व शेतकरी संघटनेचे नेते संदीप खुरुद यांनी दिला आहे.याबाबत माहिती अशी की देवळाली प्रवरा मध्ये गेली काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे या पावसामुळे परिसरातील ओढे नाले विहिरी तुडुंब झाल्या आहेत त्यातच गेली दोन दिवसापासून देवळाली प्रवरा शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने परिसरातील सर्वच शेतांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचले आहे त्यामुळे उभे असलेले कपाशी सोयाबीन ऊस भुईमूग आधी पिकांसह विविध पिके व चारा पिके पाण्याखाली गेली आहेत त्यामुळे ही पिके आता हातातून जाण्याची चिन्हे आहेत त्यामुळे  शेतकरी मोठ्या चिंतेत सापडलेला आहे कायम निसर्गाने केलेल्या अवकृपेमुळे आधीच हतबल झालेल्या शेतकरी आता मेटाकुटीस येण्याची शक्यता आहे त्यामुळे या उभ्या पिकांचे तातडीने महसूल यंत्रणेमार्फत पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळणे गरजेचे आहे तशी मागणी देखील परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे मात्र देवळाली प्रवरा येथे असलेले तलाठी हे सध्या कार्यस्थळावर उपस्थित नसल्याने व कृषी विभागाला याबाबत विचारणा केली असता हे काम आमचे नसल्याचे सांगितले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळत आहे काही शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे पिक विमा केलेले आहेत मात्र विमा कंपनीचे कोणते अधिकारी या शेतकऱ्यांकडे लक्ष देत नसल्याने तेथेही कोणताही आहे या शेतकऱ्यांना मिळताना दिसत नाही राहुरीच्या तहसीलदारांनी याबाबत तातडीने दखल घेऊन महसूल यंत्रणेमार्फत या सर्व उभ्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा तातडीने प्रयत्न करावा अन्यथा शेतकऱ्यांना आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करावे लागेल त्यात सर्वस्वी महसूल यंत्रणा जबाबदार असेल असा इशारा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शहाजी कदम व व शेतकरी संघटनेचे नेते संदीप खुरुद यांनी दिला आहे. *सध्या देवळाली चे कामगार तलाठी हे उपलब्ध नसले तरी तहसीलदारांनी तातडीने या ठिकाणी प्रभारी तलाठ्याची नेमणूक करून ह्या महसूल यंत्रणेमार्फत तातडीने अति वृष्टीमुळे  नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली असून याबाबत तहसीलदार नक्कीच आपली भूमिका बजावतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

देवळाली प्रवरा च्या कालच्या पावसाने राहुरी च्या पावसाच्या सरासरीलाही मागे टाकले आहे . राहुरी शहरासह तालुक्यात एक जून पासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे , राहुरी येथे एकूण ६२० मिलिमीटर विक्रमी पावसाची नोंद झाली आहे . देवळाली प्रवरा येथे काल ८२ मिमी  विक्रमी पाऊस झाल्याने देवळाली प्रवरा येथे एकूण ६२२  मिलिमीटर इतका एकूण पाऊस नोंद झाला असल्याने या देवळालीच्या पावसाने राहुरीला ही मागे टाकल्याचे दिसून येत आहे.

आमदार न फिरकल्याने शेतकऱ्यांची नाराजी....

शेतकरी संकटात असताना श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार लहू कानडे हे शेतकर्‍यांकडे फिरकले देखील नाही अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त करत त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News