देवळाली प्रवराचे डॉ. सागर गडाख कोरोना विरुद्धच्या लढ्यात अग्रेसर


देवळाली प्रवराचे डॉ. सागर गडाख कोरोना विरुद्धच्या लढ्यात अग्रेसर

राहुरी प्रतिनिधी-विजय एस भोसले 

  जगात थैमान घालणाऱ्या कॊरोना विरोधात सर्व भारतीय योद्धे प्राणपणाने लढा देत आहेत. यात प्रामुख्याने प्रशासन, डॉक्टर, पोलीस, नर्सेस, सफाई कामगार,त्याच प्रमाणे इतरही भारतीय योद्धे आपापल्या परीने कोरोनाला परतवून लावण्यासाठी आपले कर्तव्य चोखपणे बजावत असताना देवळाली प्रवरा येथील डॉ.सागर दत्तात्रय गडाख हे अहमदनगर येथील बूथ हॉस्पिटलमध्ये  कॊरोना विरुध्दच्या लढ्यात अग्रेसर राहून काम करीत आहे.

देवळाली प्रवरा शहराच्या शहर वासीयांच्या सहकार्यातून आज पर्यन्त  विविध वैशिष्ट्ये घेऊन देशभरात नावलौकिक प्राप्त केला आहे. राहुरी तालुक्यातील प्रशासन, नगर परिषद प्रशासन, विविध सामाजिक संघटना व नागरिक कोरोना संकटकाळात योगदान देऊन आपली सेवा करत आहेत.

 तर देवळाली प्रवरा येथील गडाख वस्ती येथील डॉ. सागर दत्तात्रय गडाख  यांची २७ जून रोजी जिल्हा परिषद अहमदनगर व जिल्हा रुग्णालय यांनी आयुष वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून तेव्हापासून आजतागायत कोरोना रुग्णांची सेवा ते प्रामाणिक पणे करत आहेत. याबाबत डॉ.गडाख यांनी सांगितले की बूथ हॉस्पिटलमध्ये जवळपास ६०० कोरोना बाधित रुग्णांनी उपचार घेतले असून ५२० जण बरे होऊन घरी परतले असून ८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.कोविड महामारीने त्रस्त रुग्णांची सेवा करण्याचे भाग्य मला लाभल्याने समाधान वाटत असल्याचे ते म्हणाले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News