कोपरगावात दशनाम गोसावी समाजाला दफनविधीसाठी स्वतंत्र जागा मिळावी !!दशनाम गोसावी समाधी बचाव समिती.


कोपरगावात दशनाम गोसावी समाजाला दफनविधीसाठी स्वतंत्र जागा मिळावी !!दशनाम गोसावी समाधी बचाव समिती.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव -दशनाम गोसावी  समाधी बचाव समिती महाराष्ट्र राज्य शाखा कोपरगाव यांचा वतीने दशनाम गोसावी समाजाला दफनभूमी साठी स्वतंत्र जागा मिळणेबाबतचा मागणीचे  निवेदन नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना देण्यात आले आहे .

 दशनाम गोसावी समाधी बचाव संघटनेचे संस्थापक श्री तपो.चंद्रकांतजी गिरी व अहमदनगर जिल्हाअध्यक्ष तपो.राजेंद्र गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली व कोपरगाव तालुका अध्यक्ष तपो.वाल्मिक लक्ष्मणगिरी गोसावी,उपाध्यक्ष तपो ऋषिकेश जितेंद्र गोसावी,कोपरगाव ता.पुर्व संघटक  तपो.दिगंबर पुरी, कोपरगाव तालुका पक्ष्चिम उप संघटक  न तपो.संजय भारती,

 तपो.प्रताप गोसावी आदिच्या उपस्थितीत देण्यात आले या निवेदनावर तपो.सुहास गोसावी, तपो.हेमंत गोसावी,तपो महेश गोसावी,श्री गौरव कोर्होळकर,श्री नंदन वाघमारे,श्री शुभम भावसार,यांच्या सह्या आहेत. दशनाम गोसावी समाजाचे पूर्वापार कोपरगाव शहरात तसेच ग्रामिण भागात वास्तव असुन परंपरेप्रमाणे गोसावी समाजात मृत्यूनंतर प्रथेप्रमाणे दफनविधी केला जातो त्यास समाधी देणे असे म्हणतात तसेच गोसावी समाजासोबतच जंगम,लिंगायत,नीलकंठ,वाणी बुरुड या समाजात देखील मृत्यूनंतर दफन करण्याची म्हणजे समाधी देण्याची प्रथा असल्याने सर्व समाजाची वाढती लोकसंख्या विचारात घेता सर्व समाजासाठी कोपरगाव शहरात सध्या दफनभूमी साठी एकच जागा असल्याने जर अगोदर एका जागेवर दफनविधी केलेला असेल तर त्याच जागेवर दुसरा कोणी दफनविधी न करण्याची प्रथा आहे परंतु दफनभूमी साठी जागा कमी असल्याने हे शक्य होतांना दिसत नाही.

  या करिता महाराष्ट्र शासनाचा दि. १७/४/२००४ ग्रामविकास व जलसंधारण विभाग मंत्रालय मुंबई च्या निर्णयानुसार प्रत्येक गावात स्वतंत्र दफनभूमी साठी जागा उपलब्ध करून द्यावी असा शासन निर्णय असून त्या नियमानुसार कोपरगाव नगरपालिकेने नगरपालिका हद्दीत गोसावी समाजाच्या दफनभूमी करिता जागा आरक्षित करून त्या जागेचा समाजास दफनभूमी करीता वापर करण्याची परवानगी द्यावी जर अशी जागा उपलब्ध नाही झाली तर नगरपालिकेने महाराष्ट्र शासनाकडे जागा मिळवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करून जागा उपलब्ध करून द्यावी अशी विनंती दशनाम गोसावी समाज बचाव समिती चे कोपरगाव तालुका अध्यक्ष तपो. वाल्मिक गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News