आबासाहेब काकडे विद्यालयाचे दहावीच्या परिक्षेत घवघवीत यश


आबासाहेब काकडे विद्यालयाचे दहावीच्या परिक्षेत घवघवीत यश

आबासाहेब काकडे विद्यालयात १० वीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या आरती गणगे हिचा सत्कार करताना प्राचार्य चंद्रकांत आहेर समवेत उपमुख्याध्यापक करमसिंग वसावे, मंदाकिनी भालसिंग व इतर.

सज्जाद पठाण शेवगाव प्रतिनिधी: एफडीएल संस्थेच्या येथील आबासाहेब काकडे विद्यालयाचा मार्च २०२० मध्ये  घेण्यात आलेल्या एसएससी परीक्षेचा निकाल ९८.८३ टक्के लागला असून विद्यालयाने उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली. विद्यालयातील ३४ विद्यार्थ्यांनी ९०टक्के पेक्षा अधिक  गुण मिळविले.

सेमी इंग्रजी माध्यमाच्या आरती गणगे आणि  तृप्ती तानवडे या विद्यार्थीनींनी ९६टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला तर  वैष्णवी लांडे ( ९५.२०टक्के ) हिने द्वितीय  व स्नेहल मगर ( ९४.४० टक्के ) हिने तृतीय क्रमांक मिळविला. मराठी माध्यमातून अक्सान पठाण  ( ९०.८०टक्के ) याने प्रथम क्रमांक पटकावला तर  द्वितीय क्रमांक अर्जून शेंडरे आणि ऋतुजा केदार  यांनी ८३.६०टक्के गुणांसह संयुक्तपणे द्वितीय तर रविदास ढाकणे  याने ८१.८०टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.  विद्यालयातून परीक्षेस ४३१ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते पैकी ४२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सेमी इंग्रजी माध्यमातील २५३ विद्यार्थ्यांपैकी २५२ तर मराठी माध्यमातील १७८ पैकी १७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.  यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अॅड. शिवाजीराव काकडे, विश्वस्त व जि.प.सदस्या  हर्षदाताई काकडे, शिक्षण समिती प्रमुख प्रा. लक्ष्मणराव बिटाळ,  प्राचार्य चंद्रकांत आहेर सर,उपप्राचार्य सुनिल आढाव, उपमुख्याध्यापक करमसिंग वसावे,पर्यवेक्षिका पुष्पलता गरुड व मंदाकिनी भालसिंग  यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News