खुनाचा प्रयत्न ,खंडणीची मागणी करून वेल्हा भागात दहशत माजवणारा दोन वर्षापासुन फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद


खुनाचा प्रयत्न ,खंडणीची मागणी करून वेल्हा भागात दहशत माजवणारा दोन वर्षापासुन फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

विठ्ठल होले पुणे

पुणे -- गुंजवणी धरण  वेल्हा येथील पॉवर हाऊसचे BOT  तत्वावर काँट्रक्शनचे काम करणारे निलेश पवार वय 36  रा.वेल्हा यांना सदरचे काम करायचे असल्यास  खंडणी द्यावी लागेल तरच पुढे काम करू देणार नाहीतर काम करू देणार नाही ,अशी धमकी देऊन खंडणी मागणाऱ्याला निलेश पवार रा. वेल्हा यांनी खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे आरोपी  *मंगेश उर्फ बाळासाहेब विठ्ठल भोरेकर व त्याचे इतर साथीदार* मिळून निलेश पवार वय 36 रा. वेल्हा व सुमित धुमाळ  यांना लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर दुखापत केली होती.सदर घटनेवरून *वेल्हा पो स्टे येथे गु. र.नं.84/2018  भा. द.वी 307,384,385,143,147,148* प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

      सदरचा गुन्हा घडल्यापासून आरोपी *नामे मंगेश उर्फ बाळासाहेब विठ्ठल भोरेकर वय 36 रा.वेल्हा ता.वेल्हा जि. पुणे* हा फरार होता. सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक त्याचा शोध घेत असताना गोपनीय बतमीदारा मार्फत माहिती मिळाली की आरोपी मंगेश उर्फ बाळासाहेब भोरेकर हा नांदेड फाटा येथे येणार आहे त्यानुसार सदर ठिकाणी सापळा लावून आरोपीस शितापीने ताब्यात घेवून वेल्हा पो.स्टे ला हजर करण्यात आले

         सदरची कामगिरी ही मा पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, रामेश्वर धोंडगे, सहा फौं दत्ता जगताप, पो हवा राजेंद्र चदनशिव, पोना विजय कांचन, पो शि अमोल शेडगे,पो शि मंगेश भगत ,पो शि बाळासाहेब खडके, पो शि धीरज जाधव, पो शि अक्षय नवले यांनी केली

जाहिरात
Search
विडिओ
Recent News