सोमेश्वर कारखान्यामार्फत सभासदांना फळझाड वृक्ष रोपांचे वाटप


सोमेश्वर कारखान्यामार्फत सभासदांना फळझाड वृक्ष रोपांचे वाटप

सुपे प्रतिनिधी / सचिन पवार 

                  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर सहकारी साखर कारखाना मार्फत पंन्नास टक्के लाभांशानुसार देशी फळ झाडे वृक्षांचे वाटप करण्यात आले, मागील तीन वर्षांपासुन हा उपक्रम पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राबविला जात आहे ,गेल्या तीन वर्षांपासुन २०१८-१९ मध्ये ५५०० वृक्ष , २०१९-२० मध्ये नऊ हजार तर यावेळी दहा हजार दोनशे पंन्नास फळ झाडे वृक्ष सभासदांना देण्यात आले आहेत ,यामध्ये प्रामुख्ये परिसातील भांगाचा भोगोलिक परिस्थितीचा आढावा घेत त्यानुसार नारळ , आंबा या बांधावरील वृक्षांचे वाटप करण्यात आले आहे , 

       आज सुपे येथील बाजार समितीचा नवीन पेट्रोल पंपाचा आवारात सोशल डिसटन्सचे पालन करत शेतकरी सभासदांना हे वृक्ष देण्यात आले , यावेळी सुपे परिसराती १५०० झाडे मोरगाव गटात वाटत झाले असुन सुपे- लोणी भापकर या भागामध्ये सभांसदांना सोईसाठी  जागापोहच झाडे वाटप करण्यात येणार आहे , अशी माहिती कारखान्याचे चेअरमन पुरोषोत्तम जगताप यांनी दिली ,

  याप्रसंगी राष्ट्रवादी बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर , सोमेश्वर सह कारखान्याचे चेअरमन पुरोषोत्तम जगताप , सभापती निता बारवकर,मा. जि. सदस्य ज्ञानेश्वरबापु कौले , सुपे गावचा सरपंच स्वाती अनिल हिरवे ,कांतीलाल मेरगळ ,तालुका उपाध्यक्ष कालिदास भोंडवे , संचालक हनुमंत शेळके , भोंडवेवाडीचे उपसरपंच राहूल भोंडवे , अभिनव कुतवळ , सोमेश्र्वर कारखानाचे संचालक गणेश चांदगुडे ,शरद खैरे ,विठ्ठल खैरे ,पोपट पानसरे,नंदा खैरे ,राजकुमार लव्हे,शफीक बागवान , अनिल हिरवे सह कारखानाचे पदाधिकारी , सभासद शेतकरी उपस्थित होते,तसेच याकार्यक्रमासाठी संचालक गणेश चांदगुडे यांचे विशेष सहकार्य लाभले,

 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News