निमगाव वाघा येथील नवनाथ विद्यालयाचा .SSC.10 वी बोर्डाचा 95.45% काल


निमगाव वाघा येथील नवनाथ विद्यालयाचा .SSC.10 वी बोर्डाचा 95.45% काल

शेतकर्‍यांच्या मुलींचे दहावीच्या परीक्षेत यश प्रणाली नाट विद्यालयात प्रथम 

वाळकी (प्रतिनिधी विजय भालसिंग) - निमगाव वाघा (ता.नगर) येथील नवनाथ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता SSC. 10 वी च्या बोर्डाच्या परिक्षेत उकृष्ट यश संपादन केले असून, विद्यालयाचा निकाल 95.45 % लागला आहे. विद्यालयाच्या गुणवत्ता यादीत प्रथम- प्रणाली रावसाहेब नाट (87.40 %), द्वितीय- दिशा राजेंद्र पवार (82.80% ), तृतीय- प्रतिक्षा विलास कापसे (81.60%) यांनी येण्याचा बहुमान पटकाविला आहे. 

शाळेतील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी 10 वी बोर्डाच्या परीक्षेत उत्तम प्रकारे गुण मिळवून आपली गुणवत्ता सिध्द केली आहे. संस्थेचे साहेबराव बोडखे, प्र.मुख्याध्यापक किसन वाबळे, भागचंद जाधव, सरपंच सुमन डोंगरे, नगर तालुका क्रीडा समितीचे उपाध्यक्ष पै.नाना डोंगरे, दिलीप जाधव, नामदेव फलके, गोकुळ जाधव, उद्योजक दिलावर शेख, अनिल डोंगरे, अरुण फलके, कोंडीभाऊ फलके, अरुण काळे, आण्णा जाधव, डॉ.विजय जाधव, भाऊसाहेब ठाणगे यांनी गुणवंत विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News