ग्रामीण भागात कोरोना आटोक्यात, सर्वच्या सर्व 40 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह, मात्र शहरात कोरोनाची बॅटिंग सुरूच 9 पोझीटीव्ह


ग्रामीण भागात कोरोना आटोक्यात, सर्वच्या सर्व 40 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह, मात्र शहरात कोरोनाची बॅटिंग सुरूच 9 पोझीटीव्ह

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी--- दौंड शहरासह तालुक्यात कोरोनाने मागील 15 दिवसात हैराण केले होते रुग्णांची संख्या वाढतच होती, परंतू दोन दिवसात अनुक्रमे शहरात 50जण निगेटिव्ह आले होते तर आज ग्रामीण भागातील 40 लोकांचे स्वाब घेण्यात आले होते त्या सर्व व्यक्ती निगेटिव्ह आले असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ अशोक राजगे यांनी सांगितले.शहरातील 30 लोकांचे स्वाब घेण्यात आले होते त्यापैकी 9 व्यक्तींचा अहवाल पोझीटीव्ह आल्याचे डॉ संग्राम डांगे यांनी सांगितले,यामध्ये 6 पुरुष व 3  महिलांचा समावेश आहे,18 ते 75 वयोगटातील व्यक्ती आहेत, पाटील चौक,बंगला साईड,नेहरू चौक, शालीमार चौक,गजानन सोसायटी,गोपाळवाडी,जनता कॉलनी,जगदाळे वस्ती, भवानी नगर या प्रत्येक ठिकाणच्या एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे सांगितले आहे,मात्र  ग्रामीण भागात कोरोना आटोक्यात येतोय त्यासाठी जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये,गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा शहरी भागात गरज असेल तरच जा,विनाकारण बाहेर जाऊ नये,मास्क लावून च बाहेर जा,शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपली जबाबदारी आपणच पार पाडली पाहिजे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News