मागासवर्गीय इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती जमाती व अल्पसंख्याक महामंडळांना निधी द्या.....आनंदा कुदळे


मागासवर्गीय इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती जमाती व अल्पसंख्याक महामंडळांना निधी द्या.....आनंदा कुदळे

विठ्ठल होले पुणे

पुणे (दि. 30 जुलै 2020) मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, भटके विमुक्त जाती जमाती व अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या आर्थिक विकास महामंडळांना केंद्र व राज्य सरकारने मंजूर केलेला निधी त्वरीत द्यावा, अशी मागणी ओबीसी संघर्ष समितीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आनंदा कुदळे यांनी केली आहे.

        मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती जमाती आणि अल्पसंख्यांक समाजाच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व जमाती विकास महामंडळ स्थापन करण्यात आले आहे. परंतू आतापर्यंत या सर्व महामंडळांना मंजूर करण्यात आलेला निधी शंभर टक्के देण्यात येत नाही. या महामंडळांचे कामकाज गेल्या अनेक वर्षापासून आर्थिक निधीअभावी ठप्प झाले आहे. त्यामुळे या समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शासन दरवर्षी आर्थिक वर्ष जवळ आल्यानंतर तुटपूंजा निधी या महामंडळाना देते. प्रशासन व संबंधित अधिका-यांच्या नाकर्तेपणामुळे दरवर्षी उपलब्ध निधी देखील वाटप केला जात नाही व उर्वरित निधी इतर खात्यांकडे वर्ग केला जातो. ही बाब या समाजावर अन्याय करणारी व बेरोजगारांच्या तोंडाला पाने पुसणारी आहे. चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला कोरोना कोविड -19 मुळे देशभर लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे विसकळीत झालेले उद्योग, व्यवसाय अद्यापही पुर्ववत सुरु झाले नाहीत. या काळात राज्यातील लाखो युवक बेरोजगार झाले. त्याचा विशेष परिणाम मागासवर्गीय समाजांवर झाला. या युवकांना व त्यांच्या कुटूंबियांना पुन्हा आर्थिक व सामाजिक सक्षमतेने उभे राहण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाने संबंधित महामंडळांना त्वरित मंजूर निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आनंदा कुदळे यांनी केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News