मोलमजुरी करणाऱ्या दांपत्याची मुलगी 90%टक्क्याने पास,आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रु!! प्राची कांबळेचे IAS होण्याचे स्वप्न


मोलमजुरी करणाऱ्या दांपत्याची मुलगी 90%टक्क्याने पास,आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रु!! प्राची कांबळेचे IAS होण्याचे स्वप्न

विठ्ठल होले पुणे

पिंपरी (दि. 29 जुलै 2020)शिक्षणाला जात,धर्म,पंथ,गरीब श्रीमंत असा भेदभाव नाही शिक्षण सर्वांना सारखेच घेता येते याची प्रचिती मोलमजुरी करणाऱ्या दांपत्याची मुलगी प्राची कांबळे हिने 10वी मध्ये 90%मार्क घेऊन पास झाली आहे, आई, वडील रोजंदारीवर मोलमजूरी करणा-या व कुटूंबाला कोणतीही शैक्षणिक पार्श्वभुमी नसतानाही प्राची दिगंबर कांबळे या विद्यार्थीनीने दहावीच्या परिक्षेत 89.80 टक्के मार्क मिळविले आहेत. संत तुकारामनगर येथील भारतीय जैन संघटनेच्या शाळेत शिकणा-या प्राचीचे वडील रोजंदारीवर गवंडी काम करतात तर आई मोलकरीण म्हणून काम करते. प्राचीला अभियांत्रिकीची पदवी घेऊन पुढे भारतीय प्रशासन सेवेत (आयएएस) जायचे आहे. प्राची कांबळेच्या यशाबद्दल मुख्याध्यापक श्रीकांत कदम आणि असंघटीत कामगार कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुंदर कांबळे यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News