पळशी येथील बाजरी, मका पिके वादळी वा-यासह भुईसपाट


पळशी येथील बाजरी, मका पिके वादळी वा-यासह भुईसपाट

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

बारामती तालुक्यातील लोणी भापकर, पळशीसह आजुबाजुच्या जिरायती भागात या आठवडाभरात पडलेल्या पावसाने अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

          सलग पाऊस पडल्याने नाले, तलाव तसेच विहिरी भरू लागल्या आहेत. त्यात पळशी व परिसरात वादळी वा-यासह पावसाचा जोर इतका होता की शेतक-यांच्या शेतात,  गोठ्यात तर काहींच्या घरात पाणी शिरले.      

बारामती तालुक्याच्या पश्चिम जिरायती पट्ट्यात बाजरी या पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. शेतक-यांनी केलेली बाजरी, मका, कडवळ अशी पिके वा-याने भुईसपाट झाली. अनेक शेतक-यांच्या फुलो-यात आलेल्या बाजरीच्या पिकांचे नुकसान झाले असुन जनावरांच्या चा-याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

  यावर्षी कोरोनामुळे शेतकऱ्यांनी केलेल्या भाजीपाला व इतर तरकारी पिकांना बाजार भाव नसल्याने शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत सापडला आहे. यंदा पाणी बऱ्यापैकी असल्यामुळे या भागात बाजरीची पिके चांगली आली होती पण पावसाने बाजरीचे पिके भुईसपाट झाली आहेत. गेल्या चार वर्षात प्रथमच बाजरीचे पिक वेळेवर पाऊस झाल्याने हाती आले होते परंतु तेही वादळी वा-याने भुईसपाट झाले असुन जवळपास सर्व शेतक-यांची हिच परिस्थिती आहे. त्यामुळे ज्यांची पिके पडली आहेत त्यांच्या पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी येथील शेतक-यांनी केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News