कोपरगाव शहरातील स्वच्छतागृहांचे आधुनिकीकरण !!


कोपरगाव शहरातील स्वच्छतागृहांचे आधुनिकीकरण !!

संजय भारती, प्रतिनिधी

कोपरगाव नगरपरिषदेने नागरिकांच्या सोयीसाठी शहरातील स्वच्छतागृह स्वरूप बदलण्याचे काम हाती घेतले असून शहरातील स्वातंत्रवीर सावरकर चौक येथील स्वच्छतागृह संपूर्ण रुपडे पालटवून अत्याधुनिक केले आहे. याच धर्तीवर शहरातील इतर वर्दळीच्या ठिकाणी असणा-या भागात देखील अशाच पुरुष व स्त्रियांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह करण्यात येणार असल्याचे या उद्घाटन प्रसंगी बोलतांना नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी सांगितले.    

नगराध्यक्ष यांनी रूढ केलेल्या प्रथेनुसार उद्घाटन याप्रभागाचे स्वच्छता कर्मचारी मनोज लोट व प्रतिष्ठित व्यापारी जवाहरशेठ शहा यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपनगराध्यक्ष योगेश बागुल, आरोग्य सभापती अनिल आप्पा आव्हाड, नगरसेवक जनार्धन कदम, राजेंद्र वाघचौरे, माजी नगरसेवक संजय कांबळे, अंकुश आढाव,उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांच्या सह स्थानिक नागरिक आदी उपस्थित होते.  

नगरपरिषदे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनानुसार बांधकाम अभियंता डिगंबर वाघ हे या कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष ठेवून आहेत. तर याकामाच्या स्वच्छतेची जबाबदारी स्वच्छता विभाग उत्तमरीत्या पार पाडत आहे. सदर कामाचे डिझाइन सुनील भगत यांनी तर बांधकाम संतोष साबळे, हारूनभाई मन्सुरी यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे.

शहर सौंदर्यातभर टाकणाऱ्या या वास्तूकडे पाहून नगरपरिषदेचे नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभापती, सर्व नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी व अधिकारी कर्मचारी यांचे  शहरातील नागरिकांनी अभिनंदन करून आभार व्यक्त करत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News