पावसाबरोबर कोरोनानेही दौंड शहरात घेतली सुट्टी,51 पैकी 50 जण निगेटिव्ह


पावसाबरोबर कोरोनानेही दौंड शहरात घेतली सुट्टी,51 पैकी  50 जण निगेटिव्ह

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी--- कोरोना आणि पाऊस यांचा कहर गेल्या आठवड्यात दौंडकर नागरिकांनी अनुभवला आहे,दौंड शहरात कोरोनाच रुग्ण संख्या वाढतच होती,त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते, परंतू 28/7/20 रोजी 51 लोकांच्या स्वाब पाठवण्यात आल्या होत्या त्यापैकी 50 जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे डॉ संग्राम डांगे यांनी सांगितले,फक्त एकच व्यक्ती कोरोना बाधीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.तरीही जनतेने उद्यापासून सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात नऊ ते पाच या वेळेत व्यवसाय सुरू होत आहेत कोणत्याही दुकानात गर्दी करू नये,आवश्यक असल्यासच घराबाहेर पडा, मास्कचा वापर करा,शासनाचे नियम पाळून सर्व व्यवहार करा, असे आवाहन नगरपालिका मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News