के.बी.पी.विद्यालयातील कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करणार !!आ. आशुतोष काळे


के.बी.पी.विद्यालयातील कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करणार !!आ. आशुतोष काळे

रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाच्या बैठकीवेळी नवनिर्वाचित अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांचा सत्कार करताना संस्थेचे व्हा.चेअरमन ऍड. भगीरथ शिंदे व मान्यवर.

शैक्षणिक गुणवत्ते बाबत तडजोड स्वीकारली जाणार नाही -आमदार आशुतोष काळे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

 कोपरगाव शहरातील केबीपी विद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करणार असल्याचे उत्तर विभाग अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागिय कार्यालयात उत्तर विभागाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी बैठकीचे आयोजन केले होते.या बैठकीसाठी रयत शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन ऍड.भगीरथ शिंदे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्या सौ.मीनाताई जगधने,दादाभाऊ कळमकर,राजेंद्र फाळके,बाबासाहेब भोस,बाळासाहेब बोठे,भाऊसाहेब कराळे, सहसचिव संजय नागपुरे,पी.पी.कनेरकर,सहाय्यक इन्स्पेक्टर सरदार,शेंडगे सर उपस्थित होते.

या बैठकीत गुणवत्ता,प्रवेश,ऑन लाईन शिक्षण आदी विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी बोलतांना आमदार आशुतोष काळे म्हणाले की,

-  कोपरगाव शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या केबीपी विद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याचे काम लवकरच हाती घेणार आहे.

संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी त्यांना अपेक्षित असलेली कामगिरी करून उत्तर विभाग गुणवत्तेच्या बाबतीत अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ज्या शाळांच्या गुणवत्ता समाधानकारक नाही अशा शाळा व्यवस्थापनाने गुणवत्ता वाढीकडे गांभीर्याने लक्ष देऊन गुणवत्ता वाढवण्यावर भर द्यावा. प्रत्येक शाळा,महाविद्यालयाच्या गुणवत्तेकडे आपण स्वतः जातीने लक्ष देणार असून शैक्षणिक गुणवत्तेबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड स्वीकारली जाणार नसल्याचे त्यांनी या बैठकीत सांगितले.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News