अहमदनगर - (प्रतिनिधी संजय सावंत)
दुष्काळावर मात करायची असेल तर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी सुरू केलेल्या वृक्षारोपण मोहिमेने आता व्यापकरूप धारण केले आहे. या वृक्षारोपण मोहिमेमुळे सहकारी संस्था आणि लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण चालू आहे, असे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी केले.निसर्ग संरक्षण दिवसाचे औचित्य साधून स्नेहबंध फाउंडेशनतर्फे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पाटील बोलत होते.
यावेळी स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे,मोटार वाहन निरीक्षक सलीम मुन्शी, धनंजय देवकर, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक जागृती फटांगरे, माधवी वाघ, प्रियंका निर्वाण, प्रियंका क्षेत्रे, सुकन्या क्षेत्रे, अमृता वांडेकर, सुरज उबाळे, संकेत मारवाडी, चेतन दसनूर, सोनाली शिरसाट, रुपाली खडसे, हेमंत ढाकेफळकर उपस्थित होते. पाटील म्हणाले, भावी पिढ्या व सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी व पावसासाठी वृक्षारोपण व संवर्धन अत्यावश्यक आहे. आभार स्नेहबंध फाऊंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी मानले.