श्री. सदगुरू माध्य. व. उच्च माध्यमिक विद्यालय देऊळगाव गाडा SSC चा 10 वीचा निकाल 98.64% विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे ही कौतुक.


श्री. सदगुरू माध्य. व. उच्च माध्यमिक विद्यालय देऊळगाव गाडा SSC  चा 10 वीचा निकाल 98.64% विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे ही कौतुक.

विशेष ( प्रतिनिधी) मिलिंद शेंडगे:

 SSC. बोर्डाचा. १0 वीचा निकाल नुकताच लागला असून यामध्ये श्री. सदगुरू माध्य. व .उच्च माध्यमिक विद्यालय विद्यार्थ्यांनी घव-घवीत यश संपादन केले आहे. शैक्षणिक वर्ष २०१९-२० चा नुकताच निकाल लागला आहे. यामध्ये या ही वर्षी विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा जोपासली आहे. विद्यालयातील विद्यार्थी, शितोळे श्रेयस रवींद्र , या विद्यार्थ्याने 92.60% गुण संपादन करून व बारवकर ऋषिकेश राजेंद्र , याने 92.60% गुण संपादन करून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकवला. तर होले किरणकुमार दत्तात्रेय याने 90.60% गुण प्राप्त करून दुसरा क्रमांक मिळवला आहे.  कु.कौले दीप्ती दत्तात्रेय हिने 88.80 गुण प्राप्त करून यश मिळवले (4) कु. टुले मोहिनी भगवान, हिने 88.60 गुण प्राप्त करून यश मिळवलं (5) कु. गाडेकर पायल बाळू .हिने 87.60 गुण प्राप्त करून, घवघवीत यश मिळवले. विद्यालयातील एकूण 74 विद्यार्थ्यांनी  परीक्षा दिली .तर त्यामध्ये 73 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह  उत्तीर्ण झाले आहेत. या गुणवंत विद्यार्थ्यांना विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने नवजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री नामदेव नाना बारवकर ,प्राचार्य व्ही.एच .बारवकर ,प्रमुख  प्रा. कैलास कुसेकर  सर , चौधरी सर , कुदळे सर , गाडेकर सर , दादा चौधरी सर , ए बी चौधरी सर , कुदळे मॅडम यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News