सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील आस्थापनांना आवाहन


सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील आस्थापनांना आवाहन

अहमदनगर, राजेंद्र दूनबळे,(प्रतिनिधी)

 जिल्हयातील शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी आस्थापनांना सुचित करण्यात येते की, केंद्र शासनाने सेवायोजन कार्यालये (रिक्तपदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा) कायदा 1959 व नियमावली 1960 अन्वये  जिल्हयातील सर्व शासकीय /निमशासकीय / सार्वजनिक व खाजगी आस्थापनांना त्यांच्या आस्थापनेमध्ये व कार्यालयामध्ये कार्यरत आसणा-या मनुष्य बळाची माहिती प्रत्येक तिमाहीस विवरण पत्र (ई आर-1) सादर करणे कायद्याने बंधनकारक आहे.

तरी माहे एप्रिल ते जुन 2020 या तिमाहीचे त्रैमासिक विवरणपत्र (ई आर-1) कोशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, महाराष्ट्र शासन या विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. विवरणपत्र (ई आर-1) विहीत मुदतीत ऑनलाईन न भरल्यास कायद्यातील कलम 5(1) व 5 (2) नुसार कार्यवाही करण्यात येईल. याबाबत संबंधित कार्यालय आस्थापना प्रमुखांनी याची नोंद घ्यावी. तसेच याबाबत काही अडचण असल्यास  0241- 2425566 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा प्रत्यक्ष संपर्क साधाव असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता , अहमदनगर यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News