नावनोंदणीचा डाटा दिनांक 15 ऑगस्ट पर्यंत अपडेट करावा


नावनोंदणीचा डाटा दिनांक 15 ऑगस्ट पर्यंत  अपडेट करावा

अहमदनगर राजेंद्र दूनबळे (प्रतिनिधी)

जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना कळविण्यात येते की, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडे नोंदणी केलेल्या उमेदवारांच्या  नावनोंदणीचा डाटा दिनांक 15 ऑगस्ट, 2020 पर्यंत www.mahaswayam.gov.in  या वेबसाईटवर अपडेट करण्यात यावा. त्यांचा नोंदणीचा डाटामध्ये मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, आधार नंबर व त्यांच्या नोंदणी अभिलेख्यामध्ये उदा. स्पेशल विषय, अनुभवाची नोंद इ. माहिती अद्यावत करण्यात यावी. अन्यथा सदर उमेदवारांची नोंदणी 15 ऑगस्ट, 2020 नंतर रद्द झाल्यास त्याची जबाबदारी संबंधितांची राहील याची नोंद घ्यावी, असे आवाहन  वि. जा. मुकणे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता , अहमदनगर यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News