76 व 84 या स्वस्तधान्य दूकानात बदल


76 व 84 या स्वस्तधान्य दूकानात बदल

अहमदनगर ,राजेंद्र दूनबळे,(प्रतिनिधी

शहरातील केडगाव व इंदिरानगर भागातील स्वस्तधान्य दुकान क्रमांक 76, 84 या दुकानांचे परवानाधारक यांचेवर जिवनावश्यक वस्तू कायदा अन्वये करवाई झाली असल्याने त्या स्वस्तधान्य दूकानाचे लाभार्थ्यांची गैरसोय होवू नये म्हणून त्या भागाचे लगत असलेले दूकानांना जोडलेले आहे.

            दूकान क्र.76 वैशाली कांबळे हे आर.एम.काकडे क्रमांक 74, शाहूनगर केडगाव यांना जोडलेले असून त्या दूकानाचे सेल्समन आर.एम.काकडे हे असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9557570555 असा आहे.

            दूकान क्र. 84 एस.डी.पटेकर हे दूकान क्रमांक 46 जयभिम सोसायटी, भवानीनगर यांना जोडलेले असून त्या दूकानाचे सेल्समन विजय काशिनाथ उमाप हे असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9767490840 असा आहे. तरी उपरोक्त 76 व 84 या स्वस्तधान्य दूकानाचे लाभार्थ्यांनी नोंद घेवून जोडलेल्या संबंधीत दूकानादार यांचेकडून नियमानुसार धान्य घेवून जावे. असे अन्नधान्य वितरण अधिकारी प्रदिपकुमार पवार यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News