राज्यातील एमएसएमई ना केंद्राच्या आत्मनिर्भर योजनेअंतर्गत सवलतींचा फायदा घ्‍यावा


राज्यातील एमएसएमई  ना केंद्राच्या आत्मनिर्भर  योजनेअंतर्गत सवलतींचा फायदा घ्‍यावा

अहमदनगर ,राजेंद्र दूनबळे,,,(प्रतिनिधी)

दि.29 :- कोव्हीड-19 समस्येमुळे एमएसएमई वर विपरीत परिणाम झालेला आहे. करीता एमएसएमई ची विस्कहीत झालेली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर योजनेअंतर्गत विविध सवलती  एमएसएमई  करीता जाहिर केलेल्या आहेत. या सवलतीचा फायदा राज्यातील जास्तीत जास्त  एमएसएमई  नी घ्यावा. यासाठी  एमएसएमई यांना मदत करणे आणि त्यांचे हॅन्ड होल्डींग करणे आवश्यक आहे. ही बाब विचारात घेवुन राजय शासनाच्यावतीने ऑनलाईन ॲप्लीकेशन तयार करण्यात आलेले आहे. हे ॲप्लीकेशन  http://www.mh-indpkg.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

          राज्यातील एमएसएमई  ना केंद्राच्या आत्मनिर्भर योजनेअंतर्गत सवलतींचा फायदा घेताना अडचणी उदभवल्यास अशा उद्योजकांनी वरील संकेतस्थळावर अर्ज सादर करावा. सदर अर्ज  संबंधित जिल्हयाचे जिल्हा उद्योग केंद्राकडे पुढील कार्यवाहीसाठी ऑनलाईन पाठविला जाईल. तसेच संबंधित जिल्हा उद्योग केंद्राकडून अर्जदाराशी संपर्क साधुन त्यांना येत असलेल्या अडचणीचे निराकरण करण्यात येईल.

            तरी अहमदनगर जिल्हयातील सर्व  एमएसएमई  धारकांनी उपरोक्त योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, अहमदनगर यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News