युवक काँग्रेस, एनएसयूआयच्या तालुकास्तरीय समन्वयकांच्या नियुक्त्या जाहीर किरण काळे यांची माहिती


युवक काँग्रेस, एनएसयूआयच्या तालुकास्तरीय समन्वयकांच्या नियुक्त्या जाहीर  किरण काळे यांची माहिती

जिल्हा समन्वयक किरण काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक कॉंग्रेस कार्यालयात पार पडली. यावेळी श्रीगोंद्याचे स्मितल वाबळे, राहुरीचे राजू बोराडे, नगर तालुक्याचे संदीप पुंड, देवेंद्र कडू पाटील, कर्जत काँग्रेसचे नेते सचिन घुले, जामखेड काँग्रेसचे अध्यक्ष जमीर सय्यद, राहुल उगले, रमेश आजबे यांच्यासह उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते.

नगर (:प्रतिनिधी संजय सावंत) युवक काँग्रेस आणि एनएसयूआयच्या तालुकास्तरीय समन्वयकांच्या नियुक्त्या युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांच्या मान्यतेने जिल्हा समन्वयक किरण काळे यांनी जाहीर केल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील नियुक्ती करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयामध्ये नुकतेच नियुक्ती पत्र देण्यात आली.

नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे. स्मितल वाबळे - नगर तालुका, पारनेर व कर्जत, संदीप पुंड - राहुरी व कोपरगाव, राजू बोरुडे - राहता व श्रीरामपूर, देवेंद्र कडू पाटील - नेवासा व शेवगाव. उर्वरित तालुक्यांसाठीच्या नियुक्त्या देखील लवकरच करण्यात येणार आहेत. नवनियुक्त समन्वयकांची बैठक देखील यावेळी पार पडली. बैठकीत नवनियुक्त समन्वयकांना मार्गदर्शन करताना जिल्हा समन्वयक किरण काळे म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात आणि युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्ह्यामध्ये युवक काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावरती युवक कार्यकर्ते काम करण्यासाठी पुढे येत आहेत. सत्यजित तांबे यांनी आपल्या संघटनात्मक कामाच्या माध्यमातून आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये युवक काँग्रेसचे मजबूत संघटन उभे केले आहे. नगर  जिल्ह्यात देखील युवक संघटना सक्षमपणे उभी राहिली आहे. संघटनेमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील त्याचबरोबर समाजाच्या विविध घटकातील नवीन तरुणांना आगामी काळामध्ये संधी देण्याचे काम केले जाणार आहे. 


युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून महाराष्ट्राच्या युवक संघटनेच्या इतिहासामध्ये नुकत्याच जाहीर झालेल्या राज्य कार्यकारणी मध्ये यावेळी पहिल्यांदाच एकूण पदाधिकार्‍यांच्या संख्ये पैकी ३३ टक्के पदाधिकारी या युवती आहेत. यामुळे विविध समाज घटकातील युवती देखील युवक काँग्रेसमध्ये काम करण्यासाठी पुढे येत आहेत ही निश्चितच समाधानाची बाब आहे. अहमदनगर जिल्ह्ययामध्ये देखील युवतींना मानाचे स्थान युवक काँग्रेसमध्ये देण्याचे काम केले जाणार असल्याचे प्रतिपादन यावेळी बोलताना किरण काळे यांनी केले.

काँग्रेस पक्षाची विद्यार्थी फ्रंटल असणाऱ्या एनएसयूआय मध्ये देखील नवीन महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना देखील मोठ्या प्रमाणावरती संधी पक्षाच्यावतीने दिली जाणार आहे. काळे पुढे म्हणाले की नवनियुक्त समन्वयकांनी तातडीने  संघटना बांधणीच्या कामाला सुरुवात करीत आपल्याला नेमून दिलेल्या तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष जात तालुक्यांचा दौरा करावा. तालुक्यात जाऊन स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या बैठकीचे आयोजन करावे. 


तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी यांच्याशी समन्वय ठेवीत तालुका कार्यकारणीचे गठण करणे, रिक्‍त असणाऱ्या तालुक्यांमध्ये तालुकाध्यक्ष पदासाठी तीन नावांची जिल्ह्याकडे शिफारस करणे, जिल्हा कार्यकारिणी साठीच्या नावांची शिफारस करणे यासाठी स्थानिक नेतृत्वाला विश्वासात घेऊन काम करावे. त्याच बरोबर गाव तिथं युवक काँग्रेस शाखा आणि महाविद्यालय तिथं विद्यार्थी काँग्रेस शाखा हा कार्यक्रम राबविण्याच्या सूचना यावेळी पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. नवनियुक्त समन्वयकांचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, युवक काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे, निरीक्षक अकिल पटेल यांनी अभिनंदन केले आहे..


 


जाहिरात
Search
विडिओ
Recent News