थोडंसं मनातलं....." किड्यांचे बरोबरच गहू रगडण्यात काय अर्थ आहे? "... ॲड शिवाजी अण्णा कराळे


थोडंसं मनातलं....." किड्यांचे बरोबरच गहू रगडण्यात काय अर्थ आहे? "... ॲड शिवाजी अण्णा कराळे

नमस्कार मित्रांनो, 

समाजात चांगल्या आणि वाईट या दोन्ही प्रवृत्ती आहेतच. पण वाईट प्रवृत्ती मुळे चांगली प्रवृत्ती नष्ट होऊ नये म्हणून समाजातील सुजाण जनतेने दक्षता घेतलीच पाहिजे. 

अहमदनगर जिल्ह्यातील आणि शहरातील कोरोना ग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हा  प्रशासन,पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासन आणि शासकीय  व खाजगी हाॅस्पिटल मधील डाॅक्टर आणि नर्स आपले जीव धोक्यात घालून कामं करत आहेत आणि   कोविड-19 चा प्रादुर्भाव पुर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे दररोज अनेक रूग्ण बरे होण्याचे प्रमाण सुद्धा चांगले आहे. परंतु सध्या समाजमाध्यमावर कोविड-19 चे संदर्भात अनेक चुकीच्या व तथ्यहिन वेगवेगळ्या आफवा पसरविल्या जात आहेत त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. त्याची दखल पोलिस प्रशासन यांनी घेऊन समाजमाध्यमावर आलेल्या मेसेज ची तपासणी करून सत्यता पडताळून पाहण्याची गरज आहे. सध्या कोविड-19 च्या काळात लाॅकडाऊन व संचारबंदी लागू असताना जनते मध्ये आरोग्याविषयी आफवा पसरविणे व जनतेची दिशाभूल करणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे प्रशासन आणि डाॅक्टर बदनाम होत आहे. उगाच " किड्यांचे बरोबर गहू रगडण्यात"  काय अर्थ आहे. महाराष्ट्र सरकारने कोविड-19 च्या पेशंट साठी "महात्मा फुले आरोग्य योजना" जाहीर केली आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व खाजगी हाॅस्पिटल यांना कोविड-19 च्या बाबतीत देण्यात येणारे सुविधा बाबतीत दर आकारणी ठरवून दिलेले आहेत. ज्या वेळी एखाद्या खाजगी हाॅस्पिटल मध्ये कोविड-19 चा पेशंट ॲडमिट केला जातो तेव्हा त्याचेवर करण्यात येणार असल्याचे उपचारासाठी सर्व साधारण किती खर्च होणार याची प्रथमच कल्पना पेशंट चे नातेवाईकांना देण्यात आली पाहिजे. तसेच महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ त्या पेशंट ला किती प्रमाणात मिळेल हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे. त्यामुळे पेशंट चे नातेवाईकांचे मनातील शंकाकुशंका आपोआप निघूनच जातील.परंतु सध्या तरी अनेक रूग्णांनी खाजगी हाॅस्पिटल मध्ये शासनाने ठरवून दिलेल्या दरा पेक्षा जास्त दर आकारला जातो अशा तक्रारी जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र सरकार कडे  केल्या आहेत. तसेच या जास्त पैसे आकारणी बाबतीत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच सध्या डाॅक्टर व महापालिका यांना प्रत्येक कोविड-19 च्या पेशंट मागे एक लाख रूपये अनुदान मिळते त्यामुळे कोविड-19 चे रिपोर्ट निगेटिव्ह असताना सुद्धा पाॅजिटीव्ह दाखविली जातात अशाही आफवा पसरविल्या जात आहेत. काही खासगी हाॅस्पिटल लाखो रूपयांची बिले वसुल करतात आणि शासनाच्या योजनेचा फायदा रूग्णांना देत नाहीत अशाही अनेक स्वरूपाचे मेसेज व्हायरल झाले आहेत. तसेच काही लोकांना कोविड-19 ची लक्षणे नसताना सुद्धा कोरोना झाल्याचे मेसेज आले आहेत.यातील काही मेसेज खरेही असतील तर काही विनाकारण बदनामी करणारे सुद्धा असु शकतील. काही समाजविघातकी लोक अशा प्रकारच्या आफवा पसरविण्यात पटाईत आहेत.     असाच एक प्रकार अहमदनगर जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. मुरंबीकर यांना कोरोना ची लागण झाली आहे अशी बातमी आली. मग स्वतः डाॅक्टर मुरंबीकर यांनीच ही बातमी खोटी व आफवा असल्याचे स्पष्ट केले. वास्तविक कोविड-19 चे पेशंट चे नाव उघड न करण्याच्या सूचना असताना सुद्धा अशी नावे का वर्तमानपत्रात छापून येतात हे मात्र अजुनही समजले नाही. याबाबत प्रशासन यांनी आपले शासकीय धोरण काय आहे हे सुद्धा जाहीर करणे आवश्यक आहे.  वास्तविक पहाता काही ठराविक  खाजगी हाॅस्पिटल मध्ये यातील काही प्रमाणात घडलेल्या घटना ख-या सुद्धा असतील यात शंकाच नाही. परंतु सध्या तरी अहमदनगर जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांनी या बाबतीत सत्यता पडताळून पहाणे आवश्यक आहे. जर खरंच काही खासगी व शासकीय हाॅस्पिटल मध्ये शासकीय नियमाचे उल्लंघन होत असेल आणि कोविड-19 च्या पेशंट कडूनच जास्त प्रमाणात बिले वसुल केली जात असतील तर त्यांचेवर रितसर गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे तरच काही प्रमाणात हा प्रश्न मार्गी लागेल असे वाटते आहे. पण जर या आफवा पसरविल्या जात असतील तर अशा बेजबाबदार लोकांना सुद्धा कायद्याचा वचक दाखवलाच पाहिजे असे वाटते. सध्या समाजमाध्यमाचा फार मोठ्या प्रमाणात दुरूपयोग होत आहे हे मात्र निश्चितच आहे. कोणताही मेसेज शहनिशा न करताच फाॅरवर्ड केला जातो त्यामुळे अनेकदा ॲडमिन अडचणीत येतात. मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत याचिका कर्त्याने खाजगी हाॅस्पिटल वर फार गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. तसेच खाजगी हाॅस्पिटल मध्ये पीपीई किट, बेडशीट, पिलो कव्हर, सॅनिटायझर, मास्क यांची बिले सुद्धा कोविड-19 च्या रूग्णाकडूनच वसुल केले जातात असे सुद्धा याचिकेत नमुद केले आहे. त्यावर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांनी महाराष्ट्र सरकारला नोटीस काढून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या बाबतीत जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन आणि महापालिका प्रशासन  यांनी तक्रारी बाबतीत लगेच शहनिशा करून दोषींना कडक शिक्षा होईल या दृष्टीने तपास केला पाहिजे. तरच नागरिकांचे मनातील शंकेचे निरसन होईल. तसेच ज्या नागरिकांना जर अशा प्रकारचे अनुभव आले असतील तर त्यांनी सबळ पुरावा देऊन पोलिस प्रशासन यांचे कडे फिर्याद दाखल केली पाहिजे. मित्रांनो, आजही अनेक डाॅक्टर आणि हाॅस्पिटल प्रशासन रूग्णाची फारच चांगली काळजी घेत आहेत हे सत्य सुद्धा नाकारता येणार नाही. जे चुकीचे वागतात त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे या मताशी मी सहमत आहे, परंतु अशा काही आफवा पसरविल्या मुळे प्रामाणिक पणे जे डाॅक्टर आणि नर्स व प्रशासन अधिकारी , पोलीस, समाजसेवक, लोकप्रतिनिधी, पत्रकार मंडळी  चांगले काम करतात ते विनाकारण नाउमेद होतात आणि मग त्यांची कधी कधी काम कण्याची इच्छा होत नाही. कोविड-19 च्या काळात अनेक डाॅक्टर, नर्स, पोलीस अधिकारी व कर्मचारी, सफाई कर्मचारी बळी गेले आहेत याची जाणीव आता आपणच ठेवली पाहिजे असे वाटते. ज्या ठिकाणी चुकीचे प्रकार घडत असतील त्या बाबतीत  लोकांनी तक्रारी जरूर केल्या पाहिजेत आणि असे अपप्रकार थांबविलेच पाहिजे यात कुणाचेही दुमत असण्याचे कारणच नाही. फक समाजमाध्यमावर आलेले मेसेज हे सत्य आहेत कि विनाकारण प्रसिद्धीसाठी काही लोक जाणूनबूजून आफवा पसरवतात याची पडताळणी करून पाहिली पाहिजे. काही मेसेज असेही येतात की, "कोरोना हा काही भयानक आजार नाही,फक्त सर्दी खोकला आला तरी काही डाॅक्टर मंडळी डायरेक्ट कोविड-19 ची चाचणी करण्याचा सल्ला रूग्णांना देतात आणि पैसे कमवितात, त्यामुळे दवाखान्यात जाऊ नका " . यामुळे सर्व सामान्य जनतेला त्रास झाला तरी व कोविड-19 ची लक्षणे असलीतरी ते दवाखान्यात जाणार नाहीत आणि कोरोना चा प्रसार जास्त होईल व जास्त प्रमाणात मनुष्य हानी होईल,  अशीही कपटी मनिषा बाळगणारे काही झारीतील शुक्राचार्य  लोक असतीलच अशी सुद्धा शंकाच उत्पन्न होतं आहे. नागरिकांनी सतर्क रहावे व खबरदारी घेणे आवश्यक आहे तरच काही प्रमाणात हा प्रश्न मार्गी लागेल असे वाटते आहे. विनाकारण कोणत्याही आफवाना बळी पडू नये. तसेच जर कोणत्याही खाजगी हाॅस्पिटल शासकीय आदेश धाब्यावर बसवले तर बिनदिक्कत त्यांचे विरूध्द आवाज उठवलाच पाहिजे, परंतु जे चांगले काम करतात त्यांना अजिबात त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी हि विनंती आहे. प्रशासन जनते सोबत आहेत. कोणत्याही कारणास्तव अडचणी आल्या तर लगेच प्रशासनाचे निदर्शनास आणून दिले पाहिजे. जर कोविड-19 चे लक्षण दिसत असतील तर नागरिकांनी घाबरून न जाता स्वतः होउन योग्य तपासणी करून घेतली पाहिजे. शासकीय सूचनांचे काटेकोर पालन करूनच आपले उद्योग व्यवसाय, नोकरी, कामधंदा करावा लागेल. घराबाहेर पडताना सॅनिटायझर मास्क आणि सोशल डिस्टन्स या तीनही गोष्टीचे जरूर पालन करावे ही नम्र विनंती. घरीच रहा सुरक्षित रहा. धन्यवाद

ॲड शिवाजी अण्णा कराळे 

सदस्य जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर

जाहिरात
Search
विडिओ
Recent News