दौंड शहरात अटी व नियमांसह सकाळी नऊ ते पाच व्यवसाय करण्यास परवानगी,सर्व नियमांचे पालन करून जनतेने सहकार्य करावे-- उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड


दौंड शहरात अटी व नियमांसह सकाळी नऊ ते पाच व्यवसाय करण्यास परवानगी,सर्व नियमांचे पालन करून जनतेने सहकार्य करावे-- उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी-- व्यापारी संघटनेच्या मागणीला यश,व्यापारी संघटनेच्या दौंड नगरपरिषद मार्फत वारंवार केलेल्या लेखी पाठपुराव्यामुळे दौंड शहरात सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात 28/7/20 रोजी दिलेल्या  आदेशानुसार व्यवसाय करण्यास माननीय उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी परवानगी दिली असल्याचे नगरपालिका मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांनी सांगितले, परंतू हे व्यवसाय करताना काही अटी व नियम पाळून करता येतील असेही यावेळी शिंदे यांनी सांगितले, कोविड 19 मुळे दौंड शहरात प्रबांधित क्षेत्र जाहीर केले होते परंतू व्यापारी संघटनेच्या माध्यमातून दौंड पुरंदरचे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांना लेखी पाठपुराव्यामुळे दौंड शहरातील व्यवसाय सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत सुरू करण्यास परवानगी दिली आहे,त्यामध्ये 1)व्यवसाय करणारे व काम करणारे कामगार हे प्रतिबंधित क्षेत्रा बाहेरील असणे गरजेचे आहे,2)सर्व व्यवसाय सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत सुरू राहतील, नगरपालिकेच्या वतीने दिलेल्या नियम व अटी पाळून करता येतील,3) दूध विक्री सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहील 4)हॉटेल,उपहारगृहे, खाद्य गृहे सकाळी नऊ ते नऊ वाजेपर्यंत सुरू राहतील परंतू फक्त पार्सल सुविधा देणे बंधनकारक आहे,5)केशकर्तनालय,पानशॉप, लॉज हे केंद्र,राज्य व जिल्हाधिकारी यांनी ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे सुरू राहतील,6)खाजगी कार्यालय नियमित कामगार संख्येच्या 10% कामगार  ठेवून सुरू राहतील 7)मध्याविक्री दुकानात दोन व्यक्ती मध्ये 6 फूट अंतर राहील आणि एकावेळी फक्त पाच व्यक्ती दुकानासमोर असतील,8) पान,तंबाखू,दारू सार्वजनिक ठिकाणी घेता(खाणे पिणे) येणार नाही 9)लग्न समारंभ व अंत्यविधी मध्ये 20 व्यक्ती असाव्यात गर्दीच्या ठिकाणी या रोगाचा प्रसार वाढत आहे,10) व्यायाम करणारे यांच्यासाठी पहाटे पाच ते सायंकाळी सात वाजेपर्यंत आपल्या जवळच्या मैदानावर गर्दी न करता सर्व नियमांचे पालन करून करायचे आहे,11)प्रतिबंधित क्षेत्रात किराणा दुकान,अत्यावश्यक वस्तूंची दुकाने, भाजीपाला,दूध विक्री तसेच रेशनिंग या सेवा सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत सुरू राहतील,

ही सर्व दुकाने आठवड्यातील पाच दिवस सुरू राहतील,त्यामध्ये सोमवार,गुरुवार,शुक्रवार,शनिवार रविवार या पाच दिवशी सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत सुरू राहतील,तसेच मंगळवार व बुधवार या दिवशी सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत,मंगळवार व बुधवार अत्यावश्यक सेवा सुरू राहतील,तसेच या दिवशी दूध विक्री सकाळी सहा ते नऊ व सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत करता येईल, हे सर्व व्यवसाय धारक नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करून व्यवसाय करतील तसेच दौंडकर जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सर्व नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मंगेश शिंदे यांनी या माध्यमातून केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News