पिकावरील गोगलगाय प्रार्दुभाव व नियंत्रण माहीती !!बांधावरील शेतीशाळा


पिकावरील गोगलगाय प्रार्दुभाव व नियंत्रण माहीती !!बांधावरील शेतीशाळा

संकलन -संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

                   बांधावरील शेतीशाळा

नमस्कार मित्रांनो

 आजच्या शेतीशाळेचे सदरामध्ये आपण पावसाच्या सुरुवातीला शेतकऱ्याला शेतामध्ये सर्वात जास्त प्रादुर्भाव करणारे गोगलगाय निरीक्षणे प्रादुर्भाव व नियंत्रणात आणण्यासाठी चे उपाय योजना यावर माहिती पाहणार आहोत

गोगलगाय🐌🐌🐌

पावसाला सुरवात झाली, की सुप्तावस्थेत जमिनीत लपून बसलेल्या आफ्रिकन राक्षसी शंखी गोगलगायींच्या झुंडीच्या झुंडी रात्रीच्या वेळी बाहेर पडताना दिसतात. ही कीड "आफ्रिकन स्नेल" या नावाने परिचित असून तिचे शास्त्रीय नाव "अचेटिना फुलिका" आहे. या किडीचे उगमस्थान पूर्व आफ्रिकेतील मादागास्कर बेट असून नावाप्रमाणे ती जगातील सर्वांत मोठी, महत्त्वाची, आधाशीपणे खाणारी आणि पिकाचे अतोनात नुकसान करणारी शंखी गोगलगाय आहे. एकूण आहाराच्या 75 टक्के त्यांचा आहार म्हणजे पडलेली पिवळी पाने,फुले,फळे,शेणखत, जनावराचे शेण,मेलेले प्राणी, कागदाचे पुठ्ठे आणि कचरा आदी आहे. दिवसा त्या लपून बसतात आणि रात्री आक्रमक होऊन पानांना छिद्रे पाडणे,कळ्या,फळे, फुले,साल,नवीन फुटींचे कोंब, नवीन रोपे,भाजीपाला,फळझाडे, कडधान्य,तेलबिया,तृणवर्गीय पिके आदींचा फडशा पाडतात. बऱ्याच वेळा संपूर्ण पीकच नष्ट होते. 

*गोगलगाय कीड वाल, कारली,झेंडू,भोपळा,भुईमूग, टोमॅटो,मका,लसूण,घास, मिरची,भेंडी,फुलकोबी,अन्य भाजीपालावर्गीय पिके व पपई,उंबर,द्राक्षआदी फळपिकांवर दिसून येते* शंखी गोगलगाय दिवसा कमी प्रकाशाच्या ठिकाणी बांधावर, गवतात,दगड,विटा,लाकूड, खडक,झुडपांच्या बुंध्याशी तसेच परिसरातील मोठ्या झाडांवर 10 ते 15 मीटर उंचीपर्यंत गेलेल्या दिसून आल्या आहेत.या किडीचा प्रसार शेतातील अवजारे, बैलगाडी,यंत्रसामग्री,ट्रॅक्‍टर -ट्रॉली, इतर वाहने,भाजीपाला, वाहतुकीचे प्लॅस्टिकचे ट्रे, शेणखत,विटा,माती,वाळू,कुड्या, कलम,रोपे,बेणे,ऊस,मॉस, इत्यादी मार्फत होतो.त्यामुळे या किडीचा प्रसार नवीन क्षेत्रात होणार नाही याबद्दल जागरूक राहून प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे.नदीला पूर आल्यानंतर पाण्याद्वारेही ही कीड एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी प्रसारित होते. 

*गोगगाईसाठीपोषक हवामान*

पावसाळ्यातील वातावरण, कमी प्रकाश, जास्त पाऊस, म्हणजेच जास्त आर्द्रता व कमी तापमान ( 20 ते 30 अंश से. ) या किडीला पोषक आहे. सर्व साधारणपणे शंखी गोगलगाय अन्नपाण्याशिवाय सहा महिने जिवंत राहू शकते.वातावरण पोषक नसेल तर ती पावसाळा संपल्यानंतर सुप्तावस्थेत जाते. उन्हाळ्यात तापमान 30 अंश से. पेक्षा जास्त आणि आर्द्रता 80 टक्‍क्‍यांपेक्षा कमी झाल्यास शंखाचे तोंड बंद करून या गोगलगायी सुप्तावस्थेत जातात. हिवाळ्यात तापमान 10 अंश से. च्या खाली आणि आर्द्रता 65 टक्‍क्‍यांच्या खाली गेल्यास सुप्तावस्थेत म्हणजे हायबरनेशनमध्ये जातात.आठ महिन्यांच्या या अवस्थेत ओलसर थंड जागेत,मातीत,सावलीत किंवा झुडपाच्या बुंध्याजवळ राहू शकतात.जेव्हा 50 मि .मी. पाऊस पडेल,तेव्हा पायांनी शंखाचे दार उघडून पुन्हा आपले कार्य सुरू करतात.त्यांना वादळ अथवा मोठ्या पावसाची अगोदर सूचना समजते. 

*जीवनक्रम*

या किडीचा जीवनक्रम अंडी, पिल्ले आणि पूर्ण वाढ झालेली गोगलगाय या तीन अवस्थेत पूर्ण होतो.आफ्रिकन शंखी गोगलगाय आपल्या नावाप्रमाणे खूप मोठी आहे.शंखीचे वजन 100 ते 150 ग्रॅम असते.तिचे शंख लांब, निमुळते भुरकट,करड्या रंगाचे असून त्यावर पिवळसर रेषा असतात. 

 *किडीची वैशिष्ट्ये*

 अंडी पांढरी - पिवळसर रंगांची असून ते गोलाकार साबुदाण्याच्या दुपटीने मोठी,पाच ते सहा मि.मी. आकाराची असतात.प्रत्येक शंखी गोगलगाय बांधाला तीन ते पाच सें.मी.खोलीचे छिद्र करून माती भुसभुशीत करते.ती तीन ते चार दिवसांत 100 ते 400 अंडी ढिगामध्ये देते.अंड्यावर चिकट द्रवाचा थर देते.एकदा अंडी दिल्यावर ती पुन्हा तिकडे फिरकत नाही.पिल्लांची काळजी घेत नाही.शंखी गोगलगायीमध्ये नर-मादी भेद नसतो.प्रत्येक शंखी अंडी घालू शकते.फलदायी अंडी देण्यासाठी मिलनाची आवश्‍यकता नसते.त्यासाठी ते योग्य साथीदाराची निवड करून एकमेकांशी सहा ते आठ तास मिलन करतात. 

 सर्वसाधारणपणे 17 दिवसांपर्यंत अंड्यातून पिल्ले बाहेर येतात.ते प्रथम माती आणि शंखीच्या अंड्याच्या कवचावर तीन ते चार दिवस उपजीविका करतात. त्यांची वाढ पूर्ण होण्यास नऊ महिने ते एक वर्षे कालावधी लागतो.या काळातही पिल्ले पिकाचे नुकसान करतात.कारण त् यांच्या वाढीसाठी चांगले खाद्य लागते.पूर्ण वाढ झालेली शंखी पाच ते 

* पिकाच्या चहूबाजूला बांधाच्या 

कडेने 1 मीटर पट्टा नांगरावा आणि त्यामध्ये राख विखरून द्यावी. 

* तसेच मोरचूद व कळीचा चुना 40:60 प्रमाणात मिसळून तीन - चार इंच रुंदीची पट्टी सभोवती टाकावी म्हणजे गोगलगायी पिकाकडे जाऊ शकणार नाहीत. तसेच चहूबाजूने झेंडूच्या दोन- तीन ओळी लावाव्यात. 

🌻 झेंडू गोगलगायींचे आवडते खाद्य असल्यामुळे त्या या पिकावर थांबतील आणि मुख्य पिकावर प्रादुर्भाव कमी होईल. 

* संध्याकाळच्या वेळी गवताचे ढीग 20-25 फूट अंतरावर शेतामध्ये ठिकठिकाणी ठेवावेत. सकाळी त्या खाली जमा झालेल्या गोगलगायी गोळा कराव्यात. 

* भाताचे काड गोगल गाईचे बिळे शोधून त्यावर जाळले असता त्यांची अंडी नष्ट होतात. गोगलगाय कीड नियंत्रण करताना या सर्व बाबींवर रासायनिक कीडनाशकांचा उपयोग करणे शेतकरी बंधूंना फायद्याचे ठरते म्हणून सर्वात महत्वाचे आपल्या शेतामध्ये जर गोगलगाय दिसत असेल तर या सर्व उपायोजना करून आपल्याला आपले पीक वाचवता येते आज या लेखाच्या माध्यमातून आपण आज गोगलगाय नियंत्रण संपूर्ण अभ्यास देत आहोत धन्यवाद.

सहकार्य -निलेश बिबवे शेतीशाळा प्रशिक्षक कृषी सहाय्यक तालुका कृषी विभाग कोपरगाव

जाहिरात
Search
विडिओ
Recent News