दौंड शहरात कोरोनाचा आकडा 300 पार,रुग्णांची संख्या वाढणे ही चिंतेची बाब जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये--डॉ संग्राम डांगे


दौंड शहरात कोरोनाचा आकडा 300 पार,रुग्णांची संख्या वाढणे ही चिंतेची बाब जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये--डॉ संग्राम डांगे

पुणे विठ्ठल होले प्रतिनिधी-:       

 दौंड शहरात पुन्हा 12 जण 14 ते 82 वयोगटातील व्यक्ती  पोझीटीव आल्याने दौंडकर नागरिकांसाठी चिंता वाढली आहे,दौंड  रुग्णालय दौंड तर्फे दिनांक 27/7/20 रोजी एकुण 73 जणाचे swab तपासणी साठी पाठवण्यात आले होते त्यांचे report आज प्राप्त झाले.

73 पैकी एकूण 12 व्यक्तीचे स्वाब positive आले आहेत तर 60 व्यक्ती चे report negative असून 1 report अद्याप बाकी आहे.Positive मध्ये महिला-- 5, पुरूष --7,दौंड शहरात एकूण -11जण कोरोना बाधीत असून ग्रामीण भागात 1व्यक्ती बाधीत आहे,अशी माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालय अधिक्षक डॉ संग्राम डांगे यांनी माहिती दिली आहे,प्रभाग निहाय रुग्ण समतानगर-2,पाटील चौक-2,बंगला साईड-2,नेहरू चौक-1,शालीमार चौक-1,सहयोग सोसायटी-1,जनता कॉलनी-1 आणि 

जगदाळे वस्ती-1 हे सर्व व्यक्ती 14 ते 82 वयोगटातील आहेत,आतापर्यंत 2558 व्यक्तींचे स्वा ब घेण्यात आले होते त्यापैकी 304 जण पो झी टी व आले आहेत,त्यापैकी 2181 लोक निगेटिव्ह आले आहेत, आता चालू घडीला 106 लोक उपचार घेत आहेत, तर 186 लोकांना घरी सोडण्यात आले आहे, 12 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ संग्राम डांगे यांनी दिली आहे. रुग्णांची दिवसेदिवस वाढतच आहे परंतू दौंडकर नागरिक या रोगाला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत,भविष्यात या रोगाला आवरताना खूप त्रास होणार आहे,तरी दौंडच्या सुजाण नागरिकांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपली आणि कुटुंबाची काळजी घ्यावी.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News