डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळ आयोजित चित्रकला स्पर्धेत दिव्यांग गटातून अक्षय वैद्य प्रथम


डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळ आयोजित  चित्रकला स्पर्धेत दिव्यांग गटातून अक्षय वैद्य प्रथम

वाळकी( प्रतिनिधी विजय भालसिंग) स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत दिव्यांग गटातून अक्षय वैद्य याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. कोरोनाच्या संक्रमणापासून बचाव व व्यसनाचे दुष्परिणामाच्या जनजागृतीसाठी या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या चित्रकला स्पर्धेत जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कोरोना योध्दे हेच खरे हिरो या विषयावर वैद्य याने सुंदर चित्र रेखाटले आहे. तो न्यू आर्टस कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयाचा विद्यार्थी असून, या यशाबद्दल डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे व युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप डोंगरे यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.  

जाहिरात
Search
विडिओ
Recent News