ठाणे- प्रतिनिधी
कोरोनाच्या महामारी मुळे गेल्या 22 मार्च 2020 पासून महाराष्ट्रा सह संपूर्ण देशात लॉकडाऊन केल्यामुळे राज्यातील सर्व व्यवहार ठप्प झाले असून कामगार, कष्टकरी, व्यापारी, शेतमजूर, शाळा कॉलेज, तसेच लाखो उद्योग धंदे बंद झाल्याने राज्यातील जनतेवर उपास मारीची वेळ आली असून लोकांच्या खिशात दमडीही नाही. अशा परीस्तीत वीज बिले तिप्पट चौपट वाढवून दिली गेल्याने नागरिक हवालदिल झाले असून जगायचं कसं हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. संबधीत अधिकारी जबरदस्तीने लाईट बिले भरण्यासाठी दबाव टाकत आहेत. घरपट्टी, पाणीपट्टी, लाईट बिले 2020 ते 2021 च्या शासकिय अर्थः संकलपातुन सरकारने भरून राज्यातील जनतेला पूर्ण माफी द्यावी .
तसेच राज्यात अनेक बँकांकडून व्याजासह कर्जाचे दंडा सह हप्ते भरण्यासाठी जनतेला वेठीस धरले जात असून स्वतः माननिय मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे यांनी लक्ष घालून राज्यातील जनतेला न्याय मिळवून द्यावा असे पार्टी ऑफ युनाइटेड इंडियन्सचे राष्ट्रीय महासचिव मा.संभाजीराव जाधव यांनी महाराष्ट्र राज्य सरकारला विनंती केली आहे