मनसेचा इशाऱ्यानंतर आता बांधकाम विभागालाही आली जाग !!


मनसेचा इशाऱ्यानंतर आता बांधकाम विभागालाही आली जाग !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सतिश काकडे यांच्या नेतृत्वाखाली प्रथम कृषी उत्पन बाजार समितीला "मनसे स्टाईल "आंदोलनाचा इशारा दिल्या नंतर काल दि.२६ जुलै रोजी बैल बाजार परीसराची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर कोपरगाव शहराजवळील टाकळी नाका ते टाकळी या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आले होते.मात्र काही दिवसातच या रस्तावर खड्डे पडुन त्यात पावसाचे पाणी साचल्याने अपघाताचे प्रमाण वाढल्याचे तसेच सदर रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे या भागातील नागरीकांनी मनसे शहराध्यक्ष सतीश आण्णा काकडे यांना भेटुन सांगीतले व आपल्या समस्या त्यांचा समोर मांडल्या, यावर मनसेने सार्वजनिक बांधकाम खात्याला दिनांक 25 जुलै निवेदन देऊन सदरचा रस्ता आठ दिवसाच्या आत पुन्हा व्यवस्थित करण्यात यावा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा देताच सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली व दिनांक 27 जुलै रोजी सदरचा रस्ता पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबी यंत्राच्या साह्याने रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरूवात केली आहे.या सामाजिक कार्याबद्दल सदर परीसरातील नागरीकांनी मनसे शहराध्यक्ष सतीश काकडे व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News