इंदापूर प्रतिनिधी ( दि. २७ ) जुलै) :
आज इंदापूर ला पुन्हा एकदा हादरवणारी घटना घडली आज इंदापूर तालुक्यात दहा जण कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत यामध्ये भिगवण येथील एका कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे. इंदापूर तालुक्यात छत्तीस जणांचे कोरोना ग्रस्तांच्या संपर्कातील नमुने तपासणीनंतर तब्बल दहा जण कोरोनाग्रस्त आढळून येण्याने इंदापूर तालुक्यातील चिंता वाढली आहे. यामध्ये भिगवण येथे सहा जण आढळून आले असून लोणी देवकर येथे एक, इंदापूर शहरात दोन, लासुर्णे येथे एक जण कोरोना ग्रस्त आढळला आहे. दररोज एकापेक्षा जास्त कोरोनाग्रस्त विविध भागात आढळत असल्याने आता खऱ्या अर्थाने नागरिकांनी चिंतित होण्याची गरज आहे.