कपाशी एकात्मिक खत व्यवस्थापन !! बांधावरची शेतीशाळा


कपाशी एकात्मिक खत व्यवस्थापन !! बांधावरची शेतीशाळा

संकलन -संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

                🌱बांधावरची शेतीशाळा🌱

नमस्कार मित्रांनो

शेतकरी मित्रांनो आजच्या शेतीशाळा सदरामध्ये आपण कपाशी पिकाचे रासायनिक व जैविक खताचे नियोजन करताना ते कशा पद्धतीने केले पाहिजे याबद्दल माहिती पाहणार आहोत आपल्या भागामध्ये बागायती कपाशी बद्दल खत व्यवस्थापन करताना संकरित कपाशी साठी 100 50 50 नत्र स्फुरद पालाश( शिफारस महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी)शेतकऱ्यांनी दिले पाहिजे यामध्ये बि टि वाणासाठी 125 65 65 npk प्रतिहेक्‍टरी देणे गरजेचे आहे ही मात्रा देत असताना आपली जवळ जमीन आरोग्य पत्रिका तपासणी अहवाल डोळ्यासमोर ठेवूनच खताचे नियोजन करणे गरजेचे आहे यामध्ये आपण प्रति एकरी 25 गाड्या शेणखत देणे गरजेचे आहे नत्र स्फुरद पालाश लागवड करताना मातीमध्ये मिसळून देणे गरजेचे आहे माती परीक्षणानुसार खतांचे नियोजन केल्यास आपल्याला खताच्या मात्रा मध्ये बदल करता येईल आपल्याला खत कमी लागेल कपाशी पिकाचे नियोजन करताना प्रमुख्याने आपण रिंग पद्धतीने मातीआड खत घातल्यास खत चांगल्याप्रकारे जमिनीत मिसळल्याने त्याची लागू होण्याची क्षमता वाढेल खतांचे नियोजन करत असताना जमिनीत जमिनीमध्ये किमान 40 टक्के ओलावा असला पाहिजे ही काळजी प्रत्येक शेतकऱ्याने घेणे गरजेचे आहे रासायनिक खते देत असताना कपाशी पिकाचे सर्व खत व्यवस्थापन करताना नत्रयुक्त खते समान दोन किंवा तीन भागात आपण दिली पाहिजे व स्फुरद व पालाश लागवड लागवडच्या वेळेस किंवा जास्तीत जास्त 30 दिवसाच्या आत मध्ये दिल्यास कपाशी पिकासाठी फायदेशीर ठरते *कपाशी पिकासाठी सुक्ष्म मुलद्रव्य रासायनिक द्रवरूप खते* देत असताना आपण याबरोबरच सूक्ष्म मूलद्रव्य मॅग्नेशियम दहा किलो/ बोरान दोन किलो/ फेरस सल्फेट दहा किलो ्रति हेक्‍टरी या प्रमाणात शेणखतामध्ये एकदा या प्रमाणात मिसळून आपण केले पाहिजे द्रवरूप खतामध्ये 19 19 19 तसेच 00 52 34या ग्रेडच्या खतांचा आपण वापर केल्यास निश्चित खत व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केले जाईल *आंतरमशागत* कपाशी पिकाची अंतर मशागत यामध्ये 1 *नांग्या भरणे* सर्वसाधारणपणे लागवडीपासून दहा दिवसात नंतर ज्या ठिकाणी कपाशी बी उगवले नाही त्या ठिकाणी नवीन बियाणे किंवा रोप नांग्या भरण्यासाठी वापरल्यास निश्चित झाडांची संख्या आपल्याला योग्य राहता येईल 2 विरळणी लागवडीनंतर 15 ते 20 दिवसांनंतर केल्यास  फायद्याचे ठरते यामुळे ज्यादा झालेल्या झाडांमुळे प्रत्येक झाडाला अपेक्षित कपाशी बोंडांची संख्या मिळणार नाही म्हणून वेळेवर विरळणी होणे फायद्याची ठरते 3 *खुरपणी* कपाशी पिकाला खुरपणी करणे फार गरजेचा आहे यावेळी शक्यतो तन नाशक न वापरता आपल्या जरुरीप्रमाणे किमान 55 दिवसांच्या अंतराने खुरपणी करणे फार गरजेचे आहे खुरपणी केल्यामुळे तानाची वाढ जास्त होणार नाही  वेळेवर तणनियंत्रण झाल्याने पिकास आवश्‍यक अन्नद्रव्य जमिनीमधून घेता येतील म्हणून खुरपणी करणे फार गरजेचे आहे यामध्ये मनुष्यबळाचे कमतरतेचा विचार करतात आपण सायकल कोळपेचा उपयोग करून योग्य प्रकारे तर नियंत्रण करू शकतो किमान 40 दिवसाच्या अंतराने आपण कपाशी पिकाला सायकल कोळपे वापरून कोळपणी केल्यास आपल्याला निश्चित योग्य प्रकारे तर नियंत्रण करता येईल किंवा पर्याय नसेल तर उगवणीपुर्वी चे पेंडीमेथिलिन तन नाशक वापरून आपण तर नियंत्रण करू शकतो *कपाशी पिकासाठी जीवामृत वापर* यामध्ये प्रामुख्याने दोनशे लिटर पाण्यामध्ये एक किलो गूळ दोन किलो जीवनु माती पाच लिटर गावरान गाईचे गोमुत्र डाळीचे 2किलोपीठ आदींचा वापर करून आठ दिवस आंबवून रोज दिवसातून तीन वेळा घड्याळाच्या दिशेने फिरवावी लावावे व असे जीवामृत किमान दोन वेळा कपाशी पिकास दिल्यास अपेक्षित जिवाणूंची संख्या शेतामध्ये योग्य राहून कपाशी पिकाचे फायदेशीर ठरतेकपाशी पिकामध्ये खत व्यवस्थापनात दिरंगाई केल्यास आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळणे अशक्य आहे म्हणून शेतकरी मित्रांनी अशा प्रकारे खत व्यवस्थापन केल्यास निश्चित फायदेशीर ठरेल.

सहकार्य - निलेश बिबवे शेती शाळा प्रशिक्षक तालुका कृषी विभाग कार्यालय कोपरगाव.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News