शहराच्या नियोजित उड्डाणपुलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव देण्यात यावे....यशस्विनी महिला ब्रिगेडची मागणी


शहराच्या नियोजित उड्डाणपुलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव देण्यात यावे....यशस्विनी महिला ब्रिगेडची मागणी

अहमदनगर(प्रतिनिधी संजय सावंत) शहरातील कित्येक वर्षापासून प्रलंबीत असलेला उड्डणपुलाचे काम लवकरच सुरु होणार असल्याने या उड्डाण पुलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव देण्याची मागणी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने मनपा उपायुक्त डॉ.प्रदिप पठारे, जिल्हाधिकारी कार्यालय व राष्ट्रीय महामार्ग कार्यालयास निवेदन दिले. यावेळी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील, मनिषा गायकवाड, रोहीणी पवार, जया वाळेकर, रोहीणी वाघीरे आदी उपस्थित होत्या.

अहमदनगर शहराच्या दृष्टीने महत्त्वाचा व नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न असलेला उड्डाणपुल सर्व पक्षीय नेत्यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेला आहे. लवकरच या पुलाचे काम सुरु होण्यास मंजुरी मिळालेली आहे. सर्वसामान्य नागरिकांची दिर्घ काळापासून असलेली मागणी प्रत्यक्षात पुर्ण होणार आहे. उड्डाणपुलाचे काम निर्धारित वेळेत पुर्ण होणे अत्यावश्यक आहे. या पुलासाठी सरकारकडून कोणत्याही परिस्थितीत निधीची कमतरता भास्ता कामा नये, अशी नगरकरांची भावना आहे.    

अहमदनगर शहराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. बुर्‍हाणनगर येथील तुळजाभवानी देवीच्या माध्यमातून शहाजी महाराजांच्या मातोश्रीच्या अनेक आठवणी नगरला आहेत. भातोडीची ऐतिहासिक लढाई, खर्डाची लढाईचा इतिहास या मातीशी जोडला गेलेला आहे. महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी व्यापाराला चालना दिली. महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. त्यांच्या अनेक आठवणी शहराशी जुडलेल्या आहेत. जुन्या बसस्थानक चौकात शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा उभारण्यात आलेला आहे. त्याच्यावरुनच हा उड्डाणपुल जात आहे. हा उड्डाणपुल शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. यामुळे या पुलास छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल असे नाव देण्याची मागणी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News