अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या पिकांचे व फळबागांचे पंचनामे करून शेतक-यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी - भाजपा युवा नेते विक्रमसिंह पाचपुते जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना दिले निवेदन


अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या पिकांचे व फळबागांचे पंचनामे करून शेतक-यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी - भाजपा युवा नेते विक्रमसिंह पाचपुते जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना दिले निवेदन

श्रीगोंदा :- अंकुश तुपे प्रतिनिधी :

श्रीगोंदा व नगर तालुक्यांसह जिल्ह्यात २३ जुलै २०२० रोजी पासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असलयाने या अतिवृष्टी मुळे शेतातील पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले असून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतक-यांना तातडीने नुकसान भरपाई देणेची मागणी भाजपा युवा नेते विक्रमसिंह बबनराव पाचपुते, व भाजपा तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, मार्केट कमिटी संचालक सतीशशेठ पोखरणा यांचेसह भाजपा पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदार याना निवेदन देऊन केली.

निवेदनात  म्हटले आहे की,  अतिवृष्टी मुळे शेतातील पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले असून या दोन्ही तालुक्यात ६५ मि.मि.पेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे त्यामुळे  शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेतक-यांनी पेरणी केलेल्या अनेक गावांतील पिके सद्या पाण्याखाली गेलेली आहेत, या शेतात साचलेल्या पाण्यामुळे बाजरी, तूर, मका, मूग, कांदा, कपाशी, ऊस,  सोयाबीन  आदी पिकांसह फळबागा हि पाण्याखाली गेलेल्या असून यामुळे शेतक-यांचे  खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. तसेच वारंवार येणारी नैसर्गिक आपत्ती बरोबरच सद्याच्या कोरोना प्रादुर्भावामुळे गंभीर समस्येमुळे  शेतक-यासमोर फार मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. शेतकरी आधीच दूध, कांदा व लिंबु यांच्या गडगडलेल्या बाजारभावामुळे व कोरोना विषाणूंमुळे संकटात सापडला असताना या होत असलेल्या अतिवृष्टीमुळे अधिकच संकटात सापडल्याने शेतक-यामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता निर्माण झालेली आहे. व याच धर्तीवर महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी हि त्यांच्याच तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने संबंधित महसूल अधिकारी व कृषी अधिका-यांना त्यांच्या मतदारसंघातील नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले असून त्याबाबत विविध वृत्तपत्रामध्ये तशा बातम्याही प्रसिद्ध झालेल्या आहेत. 

त्याच धर्तीवर श्रीगोंदा व नगर तालुक्यात शेती पिकांबरोबरच वाहून गेलेल्या शेतीचे, पडझड झालेल्या घरांचे हि पंचनामे  करून शेतक-यांना त्वरीत नुकसान भरपाई देणेची मागणी  हि यावेळी  युवा नेते विक्रमसिंह पाचपुते व भाजपा तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, मार्केट कमिटी संचालक सतीशशेठ पोखरणा, यांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष संतोष खेतमाळीस, संतोष ईथापे, शहाजी खेतमाळीस, सुनील वाळके, महावीर पटवा, राजेंद्र उकांडे, गणेश झीटे, अमोल शेलार,  महेश क्षीरसागर, रोहित गायकवाड, ऋषिकेश गोरे, श्रीकांत कांडेकर, उमेश बोरुडे, नारायण निंभोरे  इ.भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News