श्रीगोंदा(प्रतिनिधी):-सध्या देशात आणि राज्यात दररोज कोरोना रुग्ण वाढत असल्याने गर्दी टाळण्यासाठी मुस्लिम बांधवानी ईद- उल-अज्हा म्हणजेच बकर ईद ची नमाज साठी ईदगाह मैदान,मस्जिद अथवा सार्वजनिक ठिकाणी न येता घरीच अदा करावी तसेच कुर्बानी देखील नियमांचे पालन करून करावी,गो वंश कायद्याचे पालन करण्याचे आवाहन पोलीस उपाधीक्षक संजय सातव,पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,बेलवंडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद माने यांनी बकर ईद निमित्ताने आयोजित बैठकीत केले
येत्या १ऑगस्ट रोजी साजरी होणाऱ्या बकर ईद निमित्ताने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात सातव यांनी श्रीगोंदा व बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीतील मुस्लिम समाज मौलाना व नागरिकांची बैठक घेतली त्यात वरील आवाहन करण्यात आले.
दौलतराव जाधव यांनी बोलताना इतर तालुक्याच्या तुलनेत श्रीगोंदयात सामाजिक लागण झाली नाही हे सांघिक यश आहे एकत्र आल्याने संसर्ग वाढेल म्हणून नियमांचे पालन करावे,मास्क लावणे गरजेचे असून विना मास्क आढळल्यास कारवाई सुरू आहे असे सांगितले.
यावेळी चर्चेत मौलाना मोहियोद्दीन आत्तार,मौलाना शमीम कादरी,नगरसेवक निसार कुरेशी,माजी उपनगराध्यक्ष अख्तर शेख,यांनी भाग घेतला, मौलाना रहीम जकाते,बेलवंडीचे युनूस मौलाना,सलीम शेख सह प्रतिनिधी व पोलीस कर्मचारी संतोष कोपनर हजर होते
--------------------------------------