पै.गगन हाडा यांची महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या संघटनेचा कोपरगाव शहराध्यक्षपदी नियुक्ती !!


पै.गगन हाडा यांची महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या संघटनेचा कोपरगाव शहराध्यक्षपदी नियुक्ती !!

कोपरगाव संजय भारती प्रतिनिधी :

कोपरगाव शहर शिवसेना उपशहरप्रमुख पै.गगन हाडा यांची कुस्ती मल्लविद्या संघटनेचे कोपरगाव शहराध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

 पै.गगन हाडा हे कोपरगाव शहर शिवसेना उपशहरप्रमुख पदावर कार्यरत असुन सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर आहेत पै.गगना हाडा यांनी वयाच्या ९ व्या वर्षापासुन कुस्ती क्षेत्रात पर्दापन केले असुन त्यांचे वडील नॅशनल कुस्ती चॅपियन अनिल होडा यांनी पै गगन हाडा यांना मार्गदर्शन करत त्यांच्या कडुन सराव करून घेत असत त्यांनी कोल्हापूर येथे कुस्तीचे प्रशिक्षण घेतले होते.पुढे चालुन त्यांनी अहमदनगर.नाशिक,पूणे जळगाव या जिल्हा मध्ये आपले वर्चस्व गाजवले होते.

 आज त्यांचा कार्याचे कौतुक म्हणुन महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्ल विद्या संघटनेच्या वतीने संस्थापक पै.गणेशजी बानगुडे यांनी पै. गगन हाडा यांची कोपरगावशहरप्रमुख पदी नियुक्ती केली आहे.

  पै.गगन हाडा यांच्या कुस्ती मल्लविद्या शहरप्रमुख पदी निवड झाल्याचा पाश्र्वभूमीवर पै.दिपक कांदळकर,डाऊच गावचे चे सरपंच पै.संजय गुरसळ,पै. बाळासाहेब वानखेडेकर, वानखेडेकर,सामाजिक कार्यकर्ते सागरजी आहेर,सुनिल भोसले, किशोरभाऊ लकारे मामा चितळे,सिद्धार्थ वानखेडकर यांचा सह शहर शिवसेना पदाधिकारी व कार्यर्कत यांनी अभिनंदन केले आहे. तसेच सत्कार मुती पै. गगनशेठ हाडा यांनी सर्वांचे आभार मानले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News