कोर्टरोडवरील मोठे खड्डे सबंधीत विभागाने बुजवावे !! ॲड.नितिन पोळ


कोर्टरोडवरील मोठे खड्डे सबंधीत विभागाने बुजवावे !! ॲड.नितिन पोळ

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव शहरातील महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे कार्यालय ते कोपरगाव कोर्ट या रस्त्यावर नगर पालिके मार्फत नळ दुरुस्ती साठी मोठे खड्डे खोदलेले असून सदर खड्डे चांगले बुजवलेले नाही त्या मुळे सदर रस्त्यावर मोठी नाली झालेली असून पावसाचे पाणी साचलेले आहे त्यामुळे सदरचा खड्डा लक्षात येत नाही मात्र त्यामुळे या रस्त्यावरून मा.न्यायाधीश व वकिलांच्या गाड्या ये जा करतात तसेच कोर्ट कामाकरिता जाणाऱ्या पक्षकार व या भागातील नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे त्यातच खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे अनेक नागरिकांच्या गाड्या नादुरुस्त होऊन पावसाळ्यात खड्डयात साचलेल्या पाण्यामुळे गाडीवरून पडण्याचे प्रमाण वाढलेले आहे तरी सबंधीत विभागाने सदर पाईप लाईन दुरुस्ती साठी खोदलेला खड्डा त्वरित बुजवावा या मागणीचे निवेदन ॲड. नितिन पोळ यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना दिले आहे .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News